Published on
:
16 Nov 2024, 2:42 pm
Updated on
:
16 Nov 2024, 2:42 pm
मानवत : २० नोव्हेंबर ला होत असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर परभणी पोलीसांनी पो.स्टे. मानवत हद्दीत रामपुरी शिवारात अवैध दारू साठा घेऊन भरधाव वेगात जाणाऱ्या एका टेम्पोचा सुमारे २५ किमी सिनेस्टाईल पाठलाग करीत वाहनासह सुमारे ७ लाख रुपये किमतीचा अवैध दारूसाठा शनिवारी (ता.१६) जप्त केला.
सध्या विधानसभा निवडणुकीमुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आगामी निवडणूका निःपक्षपातीपणे व भयमूक्त मोकळ्या वातावरणात व्हाव्यात या उद्देशाने जिल्ह्यात अवैधरित्या बेकायदीशर दारूसाठा जप्त करून त्यावर कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना आदेश दिले होते. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पो.स्टे. मानवत हद्दीत केकर जवळा येथे पॅट्रोलींग करीत असताना त्यांना गोपनिय माहिती मिळाली की एक पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच २२ ए इन ४२६५ त्यामध्ये दारूचे बॉक्स घेवून पोखर्णी पाथरी रोडने मंगरूळच्या दिशेने रामेटाकळी कडे येत आहे. (Maharashtra assembly poll)
मिळालेल्या माहितीवरून रामेटाकळी फाटा येथे जाऊन पथकाने या गाडीस थांबण्याचा इशारा केला असता चालकाने गाडी न थांबवता भरधाव वेगाने सुसाटपणे चालवली. पथकाने त्याचा लागलीच पाठलाग करायला सुरवात केली. त्याला शेवटी रामपुरी शिवार सुनील त्र्यंबकराव यादव यांच्या शेताजवळ सार्वजनिक रोडवर रामपुरी बु. ता. मानवत येथे थांबवून चालकासह इतर दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १लाख ८८ हजार ६५ रुपयांची देशी व विदेशी दारू,मोबाईल व वाहन असा एकूण ७ लाख १ हजार ६५ रू चा मुद्देमाल ताब्यात घेऊन पो.स्टे. मानवत येथे हजर केला.
पोलिसांनी याप्रकरणी चालक शुभम जयराम लहाणे ( वय २२) रा.साकला प्लाट, परभणी , गणपत माधवराव काळे, (वय 37) रा.टाकळीकुभकर्ण, ता. जि.परभणी व निशांत भैय्यालाल जेस्वाल रा. परभणी यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे व वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणाने चालविल्याबद्दल दुपारी साडेचारच्या सुमारास गुन्हा दाखल केला . ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पाटील, स.पो.नि. संदीप बोरकर, पोउपनि गोपीनाथ वाघमारे , पोलीस अंमलदार विलास सातपुते, विष्णू चव्हाण, मधुकर ढवळे, संजय घुगे ने.स्था.गु.शा. व सायबर सेलचे गणेश कौटकर यांनी मिळून केली.(Maharashtra assembly poll)