कसब्यात कमल व्यवहारे यांना उमेदवारी:आमदार रवींद्र धंगेकरांना फटका बसणार
3 hours ago
1
कसबा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असताना माजी अामदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पाेटनिवडणुकीत काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांनी बाजी मारली अाणि कसब्याचा निकाल राज्यभर गाजला. अाता पुन्हा काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विराेधात महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी तगडे अाव्हान उभे केले. त्यातच मनसेचे उमेदवार गणेश भाेकरे यांंनी देखील निवडणुकीत रंगत अाणलेली असतानाच, काँग्रेसच्या राज्याच्या माजी महिला अध्यक्ष व माजी महापाैर कमल व्यवहारे यांनी बंडखाेरी करत अर्ज दाखल केल्याने पक्षाने त्यांच्यावर सहा वर्ष निलंबनाची कडक कारवाई केली. मात्र, कमल व्यवहारे यांच्या बंडामुळे काँग्रेस मधील मते फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याचा रवींद्र धंगेकर यांना फटका बसून त्यांच्या आमदारकीला धोका निर्माण झाल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. याबाबत कमल व्यवहारे म्हणाल्या, अनेक वर्ष मी काँग्रेस पक्षात काम केले असून त्यांनी मला उमेदवारी नाकारुन मला शिक्षा दिली अाहे का? मी माझ्या पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला अाहे. त्यामुळे पक्षात नसताना माझ्यावर कारवाई का केली गेली अाहे. अाघाडी व महायुतीचे उमेदवार उभे असताना अाम्ही पण नागरिकात सातत्यने फिरुन त्यांचे प्रश्न मार्गी लावत असताे. पुणे शहरातील कसबा मतदारसंघात अनेक एेतिहासिक मंदिरे, वाडे अाहे ते पाहण्याकरिता अनेक लाेक येतात तसेच तुळशीबाग, लक्ष्मीराेड बाजारपेठ देखील असल्याने गर्दी असते. त्यांच्यासाठी रस्ते रुंद हवे, पार्किंग उपलब्ध करुन दिली पाहिजे परंतु तसे हाेताना दिसत नाही. मी महापाैर असताना अनेक वाहतुक काेंडीचे प्रश्न साेडले असून पाचवेळा नगरसेवक असल्याने मला कसबातील विविध प्रश्नांची चांगल्याप्रकारे जाण अाहे. मी लाेकात जाऊन त्यांना प्रत्यक्ष भेटून माझा प्रचार करते अाहे. मला निवडणुकीत कीटली चिन्ह भेटली असून मला मतदार यांची सहनभुती आहे. लोक चिन्ह पाहून नाही तर व्यक्ती आणि त्याचा स्वभाव पाहून यंदा मते देतील.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)