शाळकरी मुलाची हत्याFile Photo
Published on
:
16 Nov 2024, 5:29 pm
Updated on
:
16 Nov 2024, 5:29 pm
बंगळूर ः अभ्यासात मन रमत नसलेल्या मुलाची निर्दयी बापाने हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. व्यवसायाने सुतार असलेला आरोपी रविकुमार याला पोलिसांनी अटक केली आहे.
शाळकरी मुलाच्या हत्येच्या प्रकारानंतर संशय निर्माण झाला होता. पित्याने बनाव करण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्याने खुनाची कबुली दिली. मुलगा तेजस हा नववीमध्ये शिकत होता. तो सतत मोबाईलमध्ये व्यस्त असायचा. त्याचे अभ्यासात लक्ष नव्हते. त्याचा मोबाईल खराब झाल्यानंतर पिता-पुत्रात किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर रविकुमाराने क्रिकेटची बॅट घेऊन मुलाच्या डोक्यात घातली. त्यानंतर मुलाचे डोके भिंतीवर आदळले. गंभीर दुखावत झाल्यानंतर मुलगा निपचित पडला. सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तो बेशुद्धच होता. दवाखान्यात दाखल केल्यानंतर उपचारावेळी त्याला मृत घोषित करण्यात आले.