शेअर बाजारात गुंतवणुकचे आमिष:तीन जणांची 87 लाखांची ऑनलाईन फसवणूक

2 hours ago 1
शेअर बाजारात गुंतवणुक करण्याचे आमिषाने अज्ञात सायबर चोरट्यांनी तीन जणांची ८७ लाख रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार उंड्री भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता. चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारातील विविध योजनांची माहिती देऊन अमिषाच्या जाळ्यात ओढले. गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. सुरवातीला काही परतावा देऊन विश्वास संपादन करून नंतर मोठी गुंतवणूक घेण्यात आली. चोरट्यांच्या खात्यात ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी ३६ लाख ५२ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कोंढवा भागातील आणखी एकाची १६ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस शेख पुढील तपास करत आहेत. तरुणीची ३४ लाखांची आर्थिक फसवणूक सायबर चोरट्यांनी याचपद्धतीने खराडी भागातील एका तरुणाची ३४ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक केली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी नागरिकाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article