रेडिको कंपनीच्या कामगाराच्या वारसाला नुसानभरपाई:सानुग्रह अनुदान 40 लाख रुपये, 35 हजार रुपये महिना पत्नीला मिळणार
2 hours ago
1
रेडिको डिस्टिलरी कंपनीत १५ नोव्हेंबर रोजी ३ हजार मेट्रिक टन क्षमतेची टाकी फुटून भीषण दुर्घटना झाली होती. यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. कामस्वरूपी मृत कामगार दत्तात्रय बोडरे यांच्या वारसाला २७ लाख रुपये नुकसान भरपाई, ४० लाख रुपये सानुग्रह अनुदान आणि पत्नीला ३५ हजार रुपये महिना अशा प्रकारे लाभ दिला जाणार आहे. तर ३ मंत्राटी कामगारांच्या वारसांना प्रत्येकी २२ लाख रूपये आणि नोकरी देण्याचे कंपनी प्रशासनाने १६ नोव्हेंबर रोजी जाहीर केले आहे. याची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य प्रशासनाने, कामगार विभागाने नोंद घेतली आहे. मराठा आंदोलकांनी मदत मिळून देईपर्यंत कंपनीसमोर ठिय्या आंदोलन केले. शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेंद्र एमआयडीसीतील रेडिको कंपनीत टाकी फुटून मक्याच्या ढिगाराखाली एकूण ८ कामगार दबले होते. त्यापैकी ४ कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. तर ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत कामगारांच्या कुटुंबियांनी जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृत्यू ताब्यात न घेण्यावा व त्यांच्या अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला होता. यात राजकीय नेत्यांनी उडी घेऊन कामगारांच्या कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मृत कामगारांवर अंत्यसंस्कार होणार नाही, या भुमिकेला पाठिंबा दिला होता. औद्योगिक सुरक्षा प्रशासन, कामगार विभाग, एमआयडीसी, जिल्हा प्रशासनाने याची गंभीर्याने दखल घेऊन कंपनी प्रशासनाला तातडीने नियमाप्रमाणे नुकसानभरपाई व लाभ देण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार कंपनी प्रशासनाने नुकसान भरपाई, सानुग्रह अनुदान, नोकरी, आदी लाभ देण्याचे जाहीर केले आहे. लेखी आश्वासन दिले आहे. यामुळे मृत कामगारांच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे. कायमस्वरूपी कामगाराला अधिक लाभ ३८ वर्षीय दत्तात्रय बोरडे हा कंपनीचा कायमस्वरूपी कामगार होता. यामुळे त्यांच्या वारसाला २७ लाख रुपये नुकसान भरपाई, ४० लाख रूपये सानुग्रह अनुदान, वारसाला ३५ हजार रुपये महिना याप्रमाणे लाभ मिळणार आहे. याच बरोबर डब्ल्यूसी पॉलिसी, पीएफ, ग्रॅज्युटी, टर्मप्लॅन, वन डे कॅश, पगारानुसार वेतन आदी लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पत्नीला नोकरी देण्याची तरतूद होती. त्यांनी ती नाकारली आहे. कंत्राटी कामगारांना असा मिळेल लाभ किसन हिरडे, संतोष पोपळघट आणि विजय गवळी यांना प्रत्येकी ८ लाख रूपये नुकसान भरपाई, १४ लाख रुपये सानुग्रह अनुदान आणि मृत कामगार वारसास नोकरी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)