मराठी चित्रपटांनी ‘ब्लॉकबस्टर’चे ध्येय ठेवावे:दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांचा सल्ला
2 hours ago
1
देशातील इतर कुठल्याही चित्रपटसृष्टीपेक्षा मराठी चित्रपटसृष्टी अधिक संघटीत आणि सुव्यवस्थित आहे. त्यामुळे बदलत्या काळात मराठी चित्रपटांनी तीन कोटींमध्येच अनेक चित्रपट करण्यापेक्षा, मोठ्या बजेटच्या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटांचे ध्येय ठेवावे, असा सल्ला ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी दिला. दकनी अदब फाऊंडेशन आयोजित पाचव्या डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटनाचे सत्र महेश मांजरेकर यांच्या दिलखुलास मुलाखतीने रंगतदार ठरले. निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी मांजरेकर यांच्याशी संवाद साधला. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, प्रशासकीय अधिकारी राहुल रंजन महिवाल व अस्लम हसन, डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या आयोजिका मोनिका सिंग, जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रवींद्र तोमर, युवराज शाह, शाहीर सुरेश वैराळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी व कवी राहुल रंजन महिवाल यांच्या ‘जश्न ए दिवानगी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. मध्यमवर्गीय घरातले बालपण, मराठमोठे संस्कार असल्याने चित्रपट, नाटकाचे कुठलेही वातावरण घरात नव्हते, पण जवळ राहणाऱ्या जयदेव हट्टंगडी आणि रोहिणी हट्टंगडी यांच्यामुळे रंगभूमी, चित्रपटसृष्टीशी परिचय झाला, वाढत गेला. नंतर नाटकाची कार्यशाळा केली आणि मग चित्रपटसृष्टीत रमत गेलो, असा प्रवास उलगडताना मांजरेकर यांनी अभिनेता संजय दत्तसोबत काम करतानाचे अनुभव सांगितले. दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीविषयी अनेक मिथके पसरली आहेत. मी तिथे सातत्याने काम केले आहे, करत आहे. ते व्यावसायिक जरूर आहेत, पण मराठीमध्ये आशयाची समृद्धी सर्वाधिक आहे. रंगभूमीशी जोडलेले कलाकार असल्याने अभिनयाची बाजूही मराठीकडे उत्कृष्ट आहे. मात्र, ३ कोटी रुपयांत चित्रपट हा प्रकार मराठी निर्मात्यांनी बाजूला ठेवला पाहिजे आणि किमान ५० कोटींच्या ‘ब्लॉकबस्टर’ चित्रपटाचे स्वप्न पाहून ते साकारले पाहिजे. मराठी चित्रपट देशभर प्रदर्शित केला पाहिजे आणि प्रमोशनसाठी मोठे बजेट ठेवले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन मांजरेकरांनी केले. मी सुरुवातीला ‘निदान’ हा चित्रपट केला होती, ज्यामध्ये एड्सग्रस्त मुलीची गोष्ट होती. त्यानंतर ‘वास्तव’ केला.ओ ‘अस्तित्व’चे कथानक मला माझ्या आईकडे पाहून सुचले. लग्न झाल्यावर स्त्रीच्या नावासकट बरेच काही बदलते. मग तिचे नेमके ‘अस्तित्व’ काय, या प्रश्नाने मला अस्वस्थ केले, असे मांजरेकर म्हणाले. मी एक हट्टी दिग्दर्शक आहे, असे सांगून मांजरेकर म्हणाले, चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे आणि या निर्मितीचा सूर दिग्दर्शकाने ठरवायचा असतो असे मी मानतो. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणे हा विलक्षण आनंद होता.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)