देशाचा विकास करण्याची कला भाजप जवळ:केंद्रिय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे प्रतिपादन, उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा

2 hours ago 1
उध्दव ठाकरे यांच्याकडे पाहून स्व.बाळासाहेब ठाकरे यांना आज काय वाटत असेल. सत्तेसाठी उध्दव ठाकरे विचारधारा सोडून काँग्रेस साेबत गेले. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष निर्माण करताना काँग्रेसला वेळाेवेळी विराेध केला. भाजप कधी विचारांशी प्रतारणा करत नाही. आम्ही जाती धर्म, पंथ आधारित भेदभाव करत नाही तर सर्वांना साेबत घेऊन काम करताे. सत्ता चालवण्याची आणि देशाचा विकास करण्याची कला भाजप जवळ आहे. सन २०१४ मध्ये ६०० काेटीचे बाॅम्ब गाेळे, हत्यारे निर्यात करत हाेताे आता आपण २३ हजार काेटीचे संरक्षण साहित्य निर्यात करत आहे लवकरच ते ५० हजार काेटी पर्यंत पाेहचेल असे मत केंद्रिय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केले. खडकी येथील आलेगावकर स्कूल ऑडिटेरियम येथे शिवाजीनगर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार सिध्दार्थ शिराेळे यांच्या प्रचार सभेत ते बाेलत हाेते. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रसिध्द वकील एस.के.जैन ,उद्याेजक कृष्णकुमार गाेयल, माजी उपमहापाैर सुनिता वाडेकर उपस्थित हाेते. राजनाथ सिंग म्हणाले, लाेकसभा निवडणुकीत भाजपला जे अपेक्षित यश हाेते ते मिळाले नाही. देशातील तीन ते चार राज्यात भाजपला अपेक्षा असलेली सदस्य संख्या निवडून येऊ शकली नाही. परंतु त्यानंतर हरियाणा निवडणुकीत जनतेने आम्हाला साथ दिली व यश हाती आले. हीच परिस्थिती आता महाराष्ट्र मध्ये असून महायुती सरकार पुन्हा सत्तेत येईल. केंद्र सरकार मध्ये पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे नेतृत्वात देशात मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात येत आहे. त्याचनुसार राज्यात महायुती सरकार विकासकामे काम करत आहे. चांगल्याप्रकारे काम करणारे हे सरकार आहे हे जनतेला पटलेले आहे. देशात अनेक वर्ष काँग्रेसचे सरकार राहिले आहे. ते ज्यांच्यासाेबत राहिले ते डुबले अशी परिस्थिती घडल्याचे दिसून येत आहे. सध्या ते महाराष्ट्रात उध्दव ठाकरे व शरद पवार त्यांच्या साेबत असून ते देखील लवकरच डुबतील. काँग्रेसने गरीबी हटवणे नारा दिला पण त्यात त्यांना यश आले नाही, पण एनडीए सरकारने देशात गरीबी हटविण्यासाठी सन २०१४ पासून ठाेस काम सुरु केले आहे. जगात देशाची पत खूप वाढलेली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका महत्वपूर्ण ठरत आहे. देशातील आर्थिक स्थिती सुधारलेली असून पूर्वी ११ व्या क्रमांकावर आपण हाेताे परंतु आता पाचव्या स्थानावर आर्थिक स्थितीत असून सन २०२७ पर्यंत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत आपण येऊ. महाराष्ट्रात विविध याेजनांच्या माध्यमातून काेटयावधी लाेकांना लाभ दिला गेला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article