मनोज जरांगे आज येवला दौऱ्यावर आले होते.
Published on
:
16 Nov 2024, 2:44 pm
Updated on
:
16 Nov 2024, 2:44 pm
येवला : मी भुजबळांना टार्गेट केले नाही, तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीच मराठा समाजाला टार्गेट केले आहे. मराठा समाजातील मतदारांनी आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडावे. आता त्यामुळे कुणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष? असे म्हणत आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडायचे नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (दि.१६) दिला. ते येवला दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अंदरसुल येथे त्यांच्या स्वागताला उपस्थित हजारो नागरिक उपस्थित होते.
माझा कोणत्याच पक्षाला पाठिंबा नाही, मात्र मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला पाडा असे मी कायम सांगत आलो आहे. मराठा समाज सुज्ञ आहे. त्यामुळे समाजाला माहित आहे कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे. त्यामुळे कुणी पडत असेल तर त्यात माझा काय दोष नाही. तसेच तुमचे मत वाया घालवू नका, तुम्हाला अडचणीत मदत करणाऱ्या उमेदवारालाच तुम्ही मतदान करा, असे सांगितले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येवल्यातील मराठा आंदोलक सचिन आहेर यांच्या घरी भेट देणार असून ही सांत्वनपर भेट असल्याचेही ते यावेळी म्हणाले.