Published on
:
16 Nov 2024, 12:39 pm
Updated on
:
16 Nov 2024, 12:39 pm
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: मुस्लिम बांधव मतदान करताना भेदभाव करतात, हा फेक नरेटीव्ह असल्याचे सिद्ध करा. आम्ही योजना राबवताना भेदभाव करत नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा यावेळी महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करुन महाराष्ट्रात इतिहास घडवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारड (ता. मुदखेड) येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेताना आपल्या लाडक्या बहिणींची ओवाळणी १५०० वरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन देतानाच भविष्यात या लाडक्या बहिणी लखपती झाल्या पाहिजेत, असे स्वप्नं बोलून दाखवले.
या सभेला व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, भाजपाचे निवडणूक प्रभारी आंध्रप्रदेशचे विष्णुवर्धन रेड्डी, आ. हेमंत पाटील, लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे, भोकर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीजयाताई चव्हाण आदींसह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवर घणाघाती टीका केली. लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे कोर्टाच्या पायऱ्या झिजवून आले, पण उपयोग झाला नाही आता म्हणतात, सत्तेत आल्यास या योजनेची चौकशी लावू, परंतु आपण त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. योजना पूर्ण विचार करुन पक्की केली आहे. त्यामुळे ती कायमस्वरुपी चालणार आहे. लाडक्या बहिणींसाठी १०० वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. किंबहुना सरकार पुन्हा आल्यास मानधनात ६०० रुपयांची वाढ करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
सभेत समोरच्या भागात मुस्लिम भगिनी बसल्या होत्या. त्यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले की, लाडक्या बहिणींचे पैसे तुम्हालासुद्धा मिळाले की नाही, आम्ही योजना राबवताना भेदभाव करत नाही, तुम्हीसुद्धा मतदान करताना भेद करू नका. यावेळी व्यासपीठावर दोन मुस्लिम बांधव कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीस पडले, त्यांना जवळ बोलावून त्यांच्याशी संवाद साधत योजनांमध्ये भेदभाव होतो का, असा प्रश्न विचारत मुस्लिम बांधवांना यावेळी महायुतीला विक्रमी मतदान करून महाराष्ट्रात इतिहास घडवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी करत सामाजिक सलोखा जपण्याचे आवाहन केले.
सध्या शेतकऱ्यांना केंद्र शासन ६ हजार व राज्य शासन ६ हजार रुपये देते, त्यात वाढ करुन १५ हजार रुपये देण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. ज्येष्ठ नागरिकांचेही मानधन २१०० रुपये करणार असून महाराष्ट्रात कोणीही अन्न-पाणी व निवाऱ्याविना राहू नये यासाठी रोटी- कपडा मकान योजना राबविणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
लाडक्या बहिणींना आर्थिक बळ मिळाले, परंतु त्यांच्या सुरक्षेचे असा प्रश्न उपस्थित केला जातो ती जबाबदारीही आमचीच महाराष्ट्र पोलिस दलात येत्या का २५ हजार महिलांची भरती क असल्याचे शिंदे यांनी सांगि महायुतीचे सरकार सत्तेत आल् शेतकऱ्यांना कर्जमाफी करण परंतु ७.५ हॉर्सपॉवरच्या कृषी प मोफत वीजपुरवठा करणार असल म्हणाले. जीवनावश्यक वन ते भाव स्थिर ठेवण्याचा आपला असल्याचे त्यांनी सांगितले. लाख रोजगार व १० लाख जम स्टायफंड देणारं देशातील महार एकमेव राज्य असल मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. काळात ४५ हजार गावां पाणंदरस्ते बांधणार असून अंगण व आशा वर्कर्सना १५ हजार मानधन देण्याचे आश्वासन दिले.
वेदना जाणणारे, संवेदना जपणारे आम्ही
आमचे महायुतीचे सरकार वेदना जाणते आणि संवेदना जपते. त्यामुळे शेतीपिकाचे भाव पडले तरी शेतकऱ्यांनी आता चिंता करण्याची गरज नाही. कारण मोदीजींनी भावांतर योजना आणली आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सामान्यांची दखल
मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी व्यासपीठाच्या खालून एका दिव्यांगाने त्यांना आवाज दिला. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टेजवर बोलावून त्याच्या मागणीचे निवेदन स्वीकारले. तसेच भाषण सुरू असताना खताच्या भावावरुन एक शेतकरी श्रोता ओरड करीत होता. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले.