वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवाराला आधी काळे फासले. Pudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 1:54 pm
Updated on
:
16 Nov 2024, 1:54 pm
केज, पुढारी वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा नामांकन अर्ज अवैध ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना पाठिंबा दर्शवला होता. मात्र, सचिन चव्हाण अपक्ष उमेदवाराने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने वंचितचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.
भाजप उमेदवाराला पाठिंबा का दिला म्हणून वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवाराला आधी काळे फासले. त्यानंतर चक्क चाबुकाने फटके दिले. एवढेच नाही. तर त्याचा व्हिडिओ काढून माफी देखील मागायला लावली. ही घटना केज राखीव मतदारसंघातील अंबाजोगाई शहरातील आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिसांत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. दरम्यान, पक्षाच्या अस्मितेला धक्का लागत असल्यानेच आपणही टोकाची भूमिका घेतल्याचे शैलेश कांबळे यांनी म्हटले आहे.