Published on
:
16 Nov 2024, 4:39 pm
Updated on
:
16 Nov 2024, 4:39 pm
नागपूर: विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात असताना नागपुरात अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुमारे 15 कोटी रुपयांचे सोने आणि चांदी घेऊन जाणाऱ्या एका इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या ठिकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे.
अमरावती रोडवरील कॅम्पस परिसरात पोलीस नाकाबंदी दरम्यान, संशयित हालचालीवरून या इसमास ताब्यात घेण्यात आले. उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने अंबाझरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी विनायक गाढे यांनी त्याला अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये नेले. यावेळी 17 किलो सोने , 55 किलो चांदी जप्त करण्यात आली. अर्थातच या मालवाहू वाहनातून हे सोने- चांदी नेमके कुठून आले व कुठे जात होते याविषयीचा सखोल तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वीच मध्य नागपुरात सेंट्रल एव्हेन्युवर दीड कोटी रुपयांची रक्कम एका दुचाकीवर जात असताना ताब्यात घेण्यात आली होती. देणारा व घेणारा अद्यापही गुलदस्त्यात आहे पोलीस याविषयीचा सखोल तपास करत आहे.