सौम्य थंडीचा जोर किंचित ओसरला:दिवसरात्रीच्या तापमानात दीड अंशांवर वाढ
1 hour ago
1
गत दोन दिवसांपासून पूर्वेकडून वारे वाहून येत आहेत. उत्तरी वाऱ्याचा वेग मंदावला आहे. परिणामी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत १.६ अंशानी वाढ होऊन ३२ अंश आणि किमान तापमान १.४ अंशानी वाढ होऊन १७.४ अंश सेल्सियसवर जाण्याची नोंद झाली. सौम्य थंडीचा जोर किंचित ओसरला आहे. तापमान वाढीमुळे दुपारच्या सत्रात दमट वातावरण राहून उकाडा जाणवतोय. कोल्हापूर, सांगली, सातारा, महाबळेश्वर, आदी भागत ढगाळ वातावरण होते. काही भागात पावसाच्या सरी देखील कोसळल्या. तर आपल्याकडे अंशत ढग जमा झाले होते. त्यामुळे उकाडा जाणवला. उत्तरेतील हवेचा वेग वाढण्याची शक्यता आहे. जसं जसे उत्तरी वारे सक्रिय होतील तसं तसा थंडीचा जोर वाढत जाणार आहे. मात्र, यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागू शकतो. तत्पूर्वी थंडीचा कडाका वाढला आणि पुन्हा तापमान वाढ होऊन उकाडा सुरू झाल्याने आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. तीन दिवस असे राहिल वातावरण प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस हवामान स्वच्छ ते अंशत: ढगाळ राहील. कमाल तापमान ३० ते ३२ अंश, किमान १६ ते १८ अंश सेल्सियस दरम्यान राहील. सापेक्ष आर्द्रता ३७ ते ६३ टक्के व पूर्वेकडील वाऱ्याचा वेग ५ ते ६ किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर शीत वा-यांचा वेग वाढल्याशिवाय थंडीचा जोर वाढणार नाही. तसेच थंड, उष्ण, बाष्प वारे हवामानात वेगाने बदल करतील. तापमानात चढ उतार होतील.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)