Published on
:
16 Nov 2024, 9:58 am
Updated on
:
16 Nov 2024, 9:58 am
जळगाव : चरित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा रूमालाने गळा आवळून खून केल्याची घटना शुक्रवार (दि.15) रोजी मध्यरात्री एक वाजता घडली. या गुन्ह्यातील आरोपी पतीला अटक करण्यात आली असून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्यप्रदेशातील कुसम्या येथील रहिवाशी असलेल्या सैय्यादीबाई भाया उर्फ भैय्या चव्हाण ( वय ५२) ही पती भाया उर्फ भैय्या चव्हाण (वय 58) यांच्या सोबत पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे वास्तव्याला होती. पती भाया उर्फ भैय्या चव्हाण हा तिच्यावर नेहमी चरित्र्याचा संशय घेत होता, त्यावरून त्यांचे नेहमी भांडण होत असे. शुक्रवार (दि.15) रोजी मध्यरात्री १ वाजता पत्नी झोपलेली असतांना त्याने पत्नीच्या गळ्यात रूमाल आवळून तिचा खून केला. ही घटना उघडकीला आल्यानंतर पाचोरा पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. त्यानंतर शेतकरी चंद्रकांत काशिनाथ पाटील (वय ३२ रा. गोराडखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भाया उर्फ भैय्या चव्हाण याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे.