कोल्हापुरातील तपोवन मैदानावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत प्रियांका गांधी बोलत होत्या. File Photo
Published on
:
16 Nov 2024, 12:26 pm
Updated on
:
16 Nov 2024, 12:26 pm
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील मोठे मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील ८ लाख नोकऱ्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. तुमच्या समस्यांवर बोललेले जात नाही. राज्यातील उद्योग बंद झाले आहेत, इतर गोष्टींवर ते बोलतात. पण रोजगारावर बोलत नाहीत. राज्यातील शेतकरी संकटात आहे. जिथे संधी भेटते, तिथे महाराष्ट्राला कमजोर करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली. कोल्हापुरातील तपोवन मैदानावर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आज (दि.१६) आयोजित सभेत त्या बोलत होत्या.