हिंगोली(Hingoli):- विधानसभा निवडणूक निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे 14 व 15 नोव्हेंबरला वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या छाप्यात अवैध दारू (Illegal liquor) सह वाहने असा एकूण दोन लाख 64 हजार 140 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ लाख ६४ हजार १४० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत
हिंगोली जिल्ह्यात विधानसभा आदर्श आचारसंहीता अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक १४ व १५ नोव्हेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे जिल्ह्यात सामुहीक मोहीम राबवुन निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, हिंगोली, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, हिंगोली, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, नांदेड व दुय्यम निरीक्षक हिंगोली बिट क्र. १,२ व ३ यांचे पथकाने कळमनुरी, हिंगोली, वसमत परिसरात अवैध मद्य विक्री तसेच वाहतुकीवर छापा टाकून १३ आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंद केला. या कारवाईत देशी मद्य ११५.५६ लिटर, विदेशी मद्य ५.५८ लिटर व दुचाकी वाहने ३ असा एकुण २ लाख ६४ हजार १४० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
कारवाई (action) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन मातकर, विभागीय भरारी पथक दुय्यम निरीक्षक सतीष राजगुरु, सुधीर माने, कृष्णकांत पुरी , प्रदिप गोणारकर , श्रीमती ज्योती गुट्टे तसेच स.दु.नि. देशमुख, कांबळे जवान श्री. आडे, राठोड, व ईतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली.