देशाची राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली आहे. त्यामुळे वायू प्रदूषणाची वाढती पातळी पाहता केंद्र सरकारच्या समितीने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आज म्हणजेच सोमवारी सकाळी 8 वाजल्यापासून GRAP-4 लागू करण्याचा निर्णय घेतला आहे..त्यामुळे आजपासून दहावी-बारावी वगळता अन्य विद्यार्थ्यांची ऑनलाईन शाळा भरणार आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सोशल मिडिया एक्सवर पोस्ट शेअर करत सांगितले की, सोमवारपासून GRAP-4 लागू करण्याबरोबर दहावी आणि बारावी वगळता सर्व विद्यार्थ्याची ऑनलाईन शाळा भरणार आहे. दिल्ली सरकारकडून ही घोषणा तेव्हा झाली जेव्हा पाचव्या दिवशीही हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. फेज्ड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) च्या चौथ्या टप्प्यांतर्गत NCR साठी कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (CAQM) ने कडक प्रदूषण नियंत्रण उपाय लागू केल्यानंतर काही तासांनंतर ही घोषणा झाली.
ग्रॅप-4 चा चौथा टप्पा सोमवारी सकाळी 8 प्रदूषणाची पातळी अत्यंत गंभीर श्रेणीपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) रविवारी गंभीर श्रेणीत पोहोचला होता. दिल्लीतील AQI दुपारी 4 वाजता 441 च्या आसपास नोंदवला गेला, जो प्रतिकूल हवामानामुळे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 457 पर्यंत वाढला. सोमवारी दिल्लीतील प्रदूषण अधिक जीवघेणे झाले आहे. दिल्लीतील बहुतांश भागात AQI 700 पेक्षा जास्त आहे. मुंडका येथे सर्वाधिक AQI 1185 आणि जहांगीरपुरी येथे 1040 नोंदवला गेला आहे.
ग्रॅप-4 लागू केल्यानंतर आजपासून अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या किंवा स्वच्छ इंधन (एलएनजी/सीएनजी/बीएस-VI डिझेल/इलेक्ट्रिक) वगळता कोणत्याही ट्रकला दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे आणि ग्रॅप-4 च्या अंमलबजावणीमुळे, 10 वी आणि 12वी वगळता सर्व विद्यार्थ्यांची शाळा ऑनलाईन असणार असल्याचे अतिशी यांनी म्हटले आहे.