परभणीः बैल गाडीला ऑटोची धडक, ऑटोचालकाचा अपघातात मृत्यू

1 hour ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

18 Nov 2024, 12:45 pm

Updated on

18 Nov 2024, 12:45 pm

ताडकळस : ताडकळस ते परभणी राज्य मार्गावर एक ऑटो रिक्षा बैलगाडीला धडकून अपघात झाला. या अपघात बलसा डुबे येथील ऑटोचालक ठार झाला . ही घटना दि १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. भागवत दत्ता गिरी (वय-18 वर्ष रा. बलसा ता.पुर्णा) असे मृत चालकाचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन काटेवाडे, दिपक बेंडे, नागेश पोते, यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातावेळी चालक गंभीर जखमी झाला होता. पुढील उपचारासाठी त्‍याला परभणी येथील शासकीय रुग्णालयात येथे पाठविण्यात आले परंतु डॉक्‍टरांनी त्‍याला मृत घोषीत केले.

याबाबत अधिक माहिती अशी ऑटोचालक गिरी हे ताडकळस कडुन आटोमध्ये खतांच्या बॅक घेऊन येत होते. बलसा डुबे गावाकडे येत असताना तामकळस पाटीजवळ बैलगाडीला पाठीमागून आटोची धडक बसली. आटोमधील खतांच्या बॅक अंगावर पडून व डोक्याला गंभीर मार लागल्‍याने गिरी यांचा मृत्‍यू झाला.

Meta Keywords:
Parbhani accident, bullock cart crash, auto driver death, auto collision, road accident

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article