62 टक्‍के मुंबईकर अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍स घेत स्‍वत:हून औषधोपचार करतात, सर्वेक्षणामध्ये धक्कादायक माहिती उघड

2 hours ago 1

इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)ने 2023 मध्ये केलेल्‍या संशोधनामधून वाढती अ‍ॅण्‍टीबायोटिक प्रतिरोध क्षमता वाढण्‍याचा आणि रोगजनक जीवाणूंविरोधात वापरल्‍या जाणाऱ्या अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍सची परिणामकारकता कमी होण्‍याचा धोका निदर्शनास आला. नागरिकांच्या माध्यमातून करण्यात येत असलेला अ‍ॅण्‍टीबायोटिक वापर समजून घेण्‍यासाठी फोर्टिस हॉस्पिटल्‍स मुंबईने केलेल्या सर्वेक्षणात 62 टक्‍के मुंबईकर अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍स घेत स्‍वत:हून औषधोपचार करतात, अशी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

फोर्टिस हॉस्पिटलने 30 दिवस सर्वेक्षण केले असून सर्वेक्षणामध्‍ये मुंबईकरांनी सहभाग घेतला. या सर्वेक्षणामधून व्‍यक्‍तींना अ‍ॅण्‍टीबायोटिक प्रतिरोध, त्‍यांचा वापर व जोखीमांबाबत किती माहिती आहे, हे या सर्वेक्षणामुळे उजेडात आले. त्यामुळे जबाबदार अ‍ॅण्‍टीबायोटिक वापराला त्‍वरित प्राधान्‍य देण्‍याची आणि आरोग्‍यसेवा व्यावसायिकांकडून सल्‍ला घेण्‍याची गरज दिसून येते. हिंदुस्थानात जगाच्‍या तुलनेत संसर्गजन्‍य आजारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍सचे सर्वत्र सेवन केले जाते आणि अनेकदा व्‍यक्‍ती स्‍वत:हून अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍स घेतात, ज्‍यामुळे अ‍ॅण्‍टीमायक्रोबियल रेसिस्‍टण्‍स (AMR) मध्‍ये वाढ होत आहे. जीवाणू, विषाणू, बुरशी व परजीवी असे सूक्ष्‍मजीव उत्‍परिवर्तित झाल्‍यामुळे एएमआर होतो, परिणामत: त्‍यांच्‍यामुळे होणारे संसर्ग बरे करण्‍यासाठी वापरले जाणारे औषधोपचार उपयुक्‍त ठरत नाहीत.

या सर्वेक्षणाच्‍या माध्यमातून आढळून आलेल्या महत्त्वाच्या गोष्टी टक्केवारीमध्ये

  • फक्‍त 43 टक्‍के प्रतिसादकांनी सांगितले की, त्‍यांनी त्‍यांच्‍या सुरू असलेल्‍या औषधोपचारादरम्‍यान कोणतेही ओव्‍हर-द-काऊंटर (ओटीसी) अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍स घेण्‍यासाठी डॉक्‍टरांचा सल्‍ला घेतला.
  • 53 टक्‍के प्रतिसादकांनी सांगितले की, त्‍यांनी त्‍यांच्‍या कुटुंबियांमध्‍ये किंवा मित्रांमध्‍ये समान लक्षणे दिसून आल्‍यास त्‍यांना अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍स दिली.
  • 39 टक्‍के प्रतिसादकांनी सांगितले की, त्‍यांनी डॉक्‍टरांनी प्रीस्‍क्राइब केलेला अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍सचा संपूर्ण कोर्स पूर्ण केला आणि (बरे झाल्‍यानंतर देखील) मधेच औषधोपचार थांबवले नाही.
  • 61 टक्‍के प्रतिसादकांनी सांगितले की, त्‍यांच्‍या फक्‍त नियमित आरोग्‍य तपासणीदरम्‍यान (वार्षिक तपासणी) किंवा अनिवार्य करण्‍यात आलेल्‍या फॉलो-अपदरम्‍यान त्‍यांच्‍या डॉक्‍टरांसोबत अ‍ॅण्‍टीबायोटिक वापराबाबत सल्‍लामसलत केली.
  • 40 टक्‍के प्रतिसादकांनी सांगितले की, त्‍यांना अ‍ॅण्‍टीबायोटिक कोर्स (प्रीस्क्रिप्‍शनप्रमाणे) पूर्ण न करण्‍याच्‍या संभाव्‍य परिणामांबाबत माहित नव्‍हते.

मुंबईकरांना जीवाणूजन्‍य व विषाणूजन्‍य संसर्गांमधील फरक माहित नाही.

महिनाभर करण्‍यात आलेल्‍या या सर्वेक्षणामध्‍ये शहरातील 4,511 मुंबईकरांनी प्रतिसाद दिला. एकूण प्रतिसादकांपैकी 53 टक्‍के महिला होत्‍या. सर्वेक्षणामधील बहुतांश प्रतिसादक 26 ते 50 वर्ष वयोगटातील होते, ज्‍यामध्‍ये 1,157 पुरूष आणि 1,285 महिला होत्‍या.

‘’हे सर्वेक्षण सल्‍लामसलत केल्‍याशिवाय अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍सच्‍या अधिक प्रमाणात सेवनाला प्रकाशझोतात आणते. अपुऱ्या माहितीसह स्‍वत:हून औषधोपचार केले जात असल्‍यामुळे अ‍ॅण्‍टीमायक्रोबियल रेसिस्‍टण्‍सचा धोका वाढला आहे, ज्‍याचे निराकरण करण्‍याची गरज आहे. वर्ल्‍ड एएमआर अवेअरनेस वीक 2024 (18 ते 24 नोव्‍हेंबर) देखील साजरा करणाऱ्या या सर्वेक्षणाच्‍या माध्‍यमातून आमचा अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍सचा योग्‍य वापर सक्षम करण्‍याचा आणि व्‍यक्‍तींना वैद्यकीय सल्‍ला घेण्‍यास प्रेरित करण्‍याचा मनसुबा आहे. असे करत, आम्‍ही महत्त्‍वपूर्ण उपचार अ‍ॅण्‍टीबायोटिक्‍स भावी पिढ्यांसाठी गुणकारी राहण्‍याची आशा करतो.’’ असे फोर्टिस हॉस्पिटल्‍स महाराष्‍ट्रच्‍या व्‍यवसाय प्रमुख डॉ. एस. नारायणी म्‍हणाल्‍या.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article