पुसद (Pusad Assembly elections) : येत्या 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या पुसद विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक पार पडणार आहे. या (Pusad Assembly elections) मतदारसंघांमध्ये एकूण तीन लाख 18 हजार च्या वर मतदार मतदान करणार आहेत. मात्र पुसद तालुक्याचे दुर्दैव कुठलाही उद्योग नसल्यामुळे ग्रामीण भागातील तीस हजाराच्या वर मतदार हे ऊस तोडीवर गेल्याचे असते.
ग्रामीण भागात विकास पोहोचला नसल्यामुळे उठ पाण्यासाठी उदरनिर्वाहासाठी सर्वसामान्य जनतेला ऊस तोडीसह नारायणगावला वीटभट्टीवर परिवारासह जावं लागतं या चे नियोजन प्रत्येक कारखान्याचे कारखानदार कंत्राटदार मुकदम हे प्रत्येक तालुक्यात येऊन कोयते बांधत असतात त्याचे ऍडव्हान्स म्हणून 50 हजार रुपये पर कोयता दिल्या जातात. आपल्या लहान लहान मुलांसह ग्रामीण भागातील मतदार मोठ्या प्रमाणात दरवर्षीच स्थलांतरित होत असतो. ते रोखणे येथील लोकप्रतिनिधींना जमले नाही, व (Pusad Assembly elections) पुसद तालुक्यात कुठलाही औद्योगिक युनिट्स विकास आणू शकले नाही, त्यामुळे (Pusad Assembly elections) पुसद मधील मतदार पोट पाण्यासाठी उदरनिर्वाहासाठी दरवर्षीच स्थलांतरित होत असतो मात्र त्या वीस नोव्हेंबर रोजी पार पडणाऱ्या निवडणुकीमध्ये हेच मतदार उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवारासाठी गरजेचे आहे, ते यांना परत मतदानासाठी कसे आणतात ते बघणेच गरजेचे आहे.