प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शांतता भंग!:नागपुरात माजी गृहमंत्री, अमरावतीत आमदाराच्या बहिणीच्या गाडीवर दगडफेत; नाशकात दोन पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने

2 hours ago 1
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यात शांतता भंग झाल्याचा प्रकार घडला. नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केली. या घटनेत अनिल देशमुख यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमरावतीमध्ये आमदार प्रताप अडसद यांच्या बहिणीच्या गाडीवर दगडफेकी घटना घडली आहे. या घटनेत अर्चना रोठे जखमी झाल्या आहेत. तर गंगापूर येथे अपक्ष उमेदवारावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे गंभीर जखमी झाले. दुसरीकडे नाशिकमधे दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला माजी गृहमंत्री अनिल देशमुख नागपुरातील नरखेड येथील सांगता सभा आटोपून काटोल येथे येत होते. काटोल येथील तीनखेडा-भिष्णुर मार्गाने परत येताना जलालखेडा रोडवरील बेलफाट्यावजवळ त्यांच्या गाडीचा वेग कमी झाला. याचा फायदा घेत काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या हल्ल्यात अनिल देशमुख यांच्या गाडीचा काच फुटला आणि दगड थेट अनिल देशमुखांच्या डोक्याला लागला. यात देशमुख जखमी झाले असून त्यांच्यावर काटोल येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. नाशकात भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनो-सामने नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये आज भाजप आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे पहायला मिळाले. यावेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांच्याकडून पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या गदारोळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणेश गिते यांच्या एका कार्यकर्त्याची गाडी देखील फोडली. नाशिक शहरातील पंचवटी परिसरात ही घटना घडली. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीदेखील नाशिकमध्ये अशीच घटना घडली होती. गंगापुरात अपक्ष उमेदवारावर जीवघेणा हल्ला गंगापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर अज्ञात आरोपींनी दगडफेक केली. गंगापूर तालुक्यातील लांजी परिसरात हा हल्ला झाला. या हल्ल्यात सुरेश सोनवणे यांच्यासह दोन सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. सुरेश सोनवणे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार प्रताप अडसद यांच्या बहिणीच्या गाडीवर दगडफेक अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार प्रताप अडसद यांच्या बहीणीच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रताप अडसद यांच्या भगिनी अर्चना रोठे या कारने सातेफळ फाट्यावरुन जात असताना त्यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत अर्चना रोठे जखमी झाल्या आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article