लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी केले आहे. अमरावती महापालिकेच्या पुढाकाराने सोमवारी सकाळी शहरात बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, स्वीप कक्षाच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, पोलिस आयुक्त डॉ. नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, मनपा उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, सहायक आयुक्त भूषण पुसतकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस, डीआरडीएच्या प्रकल्प संचालका प्रिती देशमुख, जिल्हा स्वीप कक्षाचे ज्ञानेश्वर घाटे, संजय राठी, राजेश सावरकर, हेमंतकुमार यावले, नितिन माहोरे आदी मान्यवर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहभागी झाले होते. पद्मश्री पापळकर पुढे म्हणाले, लोकशाहीमध्ये मताधिकार फार महत्वाचा आहे. मतदानाचा उपयोग करुन एकप्रकारे आपणच आपल्यासाठीचे धोरण निश्चित करीत असतो. लोकप्रतिनिधी हे आपले प्रतिनिधी म्हणून धोरण आखतात. पण त्यामागचे खरे सूत्रधार आपण (मतदार) असतो. त्यामुळे सर्वांनी या राष्ट्रीय कार्यात आवर्जून सहभागी व्हावे, असा आग्रहही त्यांनी केला. पद्मश्री शंकरबाबा पापळकर हे आपल्या जिल्ह्यासाठीचे आयकॉन आहेत. त्यामुळे त्यांचा आग्रह हा देखील फार महत्वाचा आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीची ही बाईक रॅली ॲकडेमीक हायस्कुलच्या प्रांगणातून सोमवारी सकाळी ९ वाजता सुरु झाली. त्यानंतर प्रमुख चौकातून जनजागरण करीत ती सायन्सकोर मैदानात पोचली. याठिकाणी रॅलीचा समारोप झाला. जिल्हाधिकारी सौरभ कटियार व इतर मान्यवरांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. यादृष्टीने मोठ्या प्रमाणात मतदान करा, असा संदेश यावेळी मान्यवरांनी दिला. या जनजागृती रॅलीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. विविध घोषवाक्य असलेले फलक रॅलीतील बाईकस्वारांच्या हातात होते. यावेळी सहाय्यक आयुक्त सुभाष जानोरे, नंदकिशोर तिखिले व धनंजय शिंदे, बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण, शिक्षणाधिकारी तथा स्विप नोडल अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, पशुशल्य चिकीत्सक डॉ. सचिन बोंद्रे, सहायक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, शाळा निरीक्षक योगेश पखाले, वहीद खान, संतोष केंद्रे, प्रवीण ठाकरे, योगेश राणे, पंकज सपकाळ, निजामुद्दीन काझी तथा सर्व विभाग प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, मनपा कर्मचारी, अनेक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)