पालघर पोलिस ठाण्यासमोर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती Pudhari Photo
Published on
:
18 Nov 2024, 5:31 pm
Updated on
:
18 Nov 2024, 5:31 pm
पालघर : पालघर शहरातील विष्णूनगर परिसरामध्ये असलेल्या वर्धमान गृहनिवासी संकुलामध्ये पैसे वाटपावरून शिंदे व ठाकरे गटात राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे नगरसेवक पैसे वाटप करत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालघर पोलिसांत तशी तक्रार केली आहे.
पालघर शहरातील शिंदे गटाचे नगरसेवक रवींद्र म्हात्रे व अमोल पाटील यांनी पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाचा आरोप असून घटनास्थळी पालघर पोलिसांनी हजर होऊन रवींद्र म्हात्रे यांची कार ताब्यात घेतली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी म्हात्रे यांची कार तक्रारदार यांच्यासमोर तपासली असून गाडीत पोलिसांना काहीही आढळले नाही. तर काही किरकोळ प्रचार साहित्य गाडीत होते.
दरम्यान ठाकरे गटाच्या समूहाने पैसे वाटप केल्याचा आरोप केला. त्यावेळी गाडी तपासायला आम्ही सांगितले. पोलिसांनीही गाडीची तपासणी केली.त्यात काहीही आढळले नाही.मात्र आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचे माजी नगरसेवक अमोल पाटील यांनी या प्रकारावर बोलताना म्हटले.