वर्ध्यात आचारसंहितेदरम्यान दारूसाठ्यासह ३ कोटी ९७ लाखांचा मुद्देमाल जप्त केली.
Published on
:
18 Nov 2024, 5:52 pm
Updated on
:
18 Nov 2024, 5:52 pm
वर्धा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता लागू झाल्यापासून १५ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाई करण्यात आली. त्यात अवैध दारु विक्री व वाहतूक करणार्या संशयितांवर कारवाई करण्यात आली. या संशयित आरोपींच्या ताब्यातून ३ कोटी ९७ लाख ७५ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपिंविरुध्द वर्धा जिल्ह्यात १११८ गुन्हे नोंद करण्यात आले.
१५ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली. जिल्ह्यात आदर्श आचार संहितेचा भंग होऊ नये तसेच विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी याकरीता पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांनी अवैध व्यवसाय करणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या कालावधीत वर्धा शहरात अवैध अंमली पदार्थ (गांजा) विक्री करणारा आरोपींच्या ताब्यातून २९६.७ ग्रॅम जप्त करुन गुन्हा नोंद करण्यात आला. अवैध अंमली पदार्थ (एमडी) विक्री करणारे आरोपीच्या ताब्यातुन २ ग्रॅम, ५२ मिली ग्रॅम (कि. १०,०८० रु.) मुद्देमाल जप्त करुन गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस ठाणे सिंदी (रेल्वे) व आर्वी येथे अवैद्यरित्या सुगंधित तंबाखु विक्री करणार्यावर कारवाई करुन त्यांचे ताब्यातून १२५.८२३ किलो ग्रॅम ( १,७०,६०१) रुपयांचा मुद्देमाल माल जप्त करुन गुन्हे नोंद करण्यात आले.
अवैध व्यवसाय व गुंड प्रवृत्तीला आळा बसावा, यासाठी कारवाई करुन ७२ संशयितांना वर्धा जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात हद्दपार करण्यात आले. तसेच १४४ सिआरपीसी अंतर्गत ५८ गुंडांना गावबंदी करण्यात आली. विधानसभा निवडणूकसंबंधने वर्धा जिल्ह्यात रोख रक्कम जप्तीच्या २७ कारवाई करुन ८० लाख ७९ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.