न्यूझीलंड क्रिकेट टीमने भारत दौऱ्यात इतिहास रचला. न्यूझीलंडने टॉम लॅथम याच्या नेतृत्वात टीम इंडियाला मायदेशात 3-0 अशा फरकाने लोळवत ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला. मात्र त्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर न्यूझीलंडची बत्ती गुल झाली. उभसंघातील 2 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत राहिली. मात्र श्रीलंकने न्यूझीलंडला टी 20i मालिकेत पराभूत केलं. श्रीलंकेने सलग 2 सामने जिंकत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा फरकाने एकतर्फी आघाडी घेतली. आता श्रीलंकेकडे तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात किंवींना पराभूत करत विजयी हॅटट्रिकसह क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड शेवटचा सामना जिंकून दौऱ्यांची सांगता करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.
श्रीलंका टीम : चरिथ असालंका (कर्णधार), लाहिरू उदारा (विकेटकीपर), अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, सदीरा समराविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, महेश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, कुशल परेरा, दुशन हेमंथा, निशान मधुष्का, मोहम्मद शिराज, चामिंडू विक्रमसिंघे आणि एशान मलिंगा.
न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, टिम रॉबिन्सन, हेन्री निकोल्स, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मिच हे (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, नॅथन स्मिथ, ईश सोधी, जेकब डफी, ॲडम मिल्ने, डीन फॉक्सक्रॉफ्ट, जॅकरी फॉल्केस आणि जोश क्लार्कसन.