बडोलेंना राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय माझा व फडणवीसांचा:कार्यकर्त्यांनी मनातील गैरसमज दूर करावा - नितीन गडकरी
2 hours ago
1
मुंबईतील इंदूमिलची जागा डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मिळवून घेण्याचे एक चांगले काम राजकुमार बडोले यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात झाले असून लंडन येथे डॉ. बाबासाहेब राहिले ते घर विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासारखे चांगले काम त्यांनी केले आहे. भाजपचा कर्मठ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. बडोलेंना राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय बडोलेंचा नव्हता तर देवेंद्र फडणवीस व माझा होता, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यानो आपल्या मनातील गैरसमज दूर करावा,असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. शेतीच्या व्यवसायासोबत मत्स्य व दुग्धव्यवसाय शेतकरी वर्गाला पोषक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपल्या भागात गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्याचे काम राज्यसरकार करणार आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात येथील मासे, झिंगे पोचविण्याचे काम होणार आहे. या जिल्ह्यात दुध व्यवसाय असून दुधाला चांगले भाव देण्याचा प्रयत्न मदर डेयरीच्या माध्यमातून केला आहे. सध्या ५ लाख लिटर दूध घेत असून पुढच्या काही वर्षात ५० लाख लिटर दूध खरेदीची योजना आहे. दुग्धक्रांती नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार असून दहा पटीने या व्यवसायात वाढ होणार आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारसभेत सडक अर्जुनी येथे बोलत होते. गडकरी म्हणाले, ८० टक्के खनिज संपती ही विदर्भातील जिल्ह्यात आहे. या भागात रस्ते व सिंचनाचे प्रकल्पांचे काम करतांना अनेक अडचणी येतात, त्या दूर करुन कामे केली जात आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)