Published on
:
18 Nov 2024, 4:17 pm
Updated on
:
18 Nov 2024, 4:17 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात देशमुख जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतरचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कारमध्ये चालकाच्या शेजारी असलेल्या सीटवर अनिल देशमुख बसलेले असून त्यांच्या गाडीची काच फुटल्याचे छायाचित्र आणि व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोल या त्यांच्या परंपरागत विधानसभा मतदारसंघात यावेळी त्यांच्याऐवजी सुपुत्र सलील देशमुख निवडणूक लढत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा शांत झाल्यानंतर ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. या मतदारसंघातील नरखेड येथील आज (दि. 18) निवडणूक प्रचाराची सांगता सभा आटोपून देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गाने परत येत होते. त्यानंतर ही घटना घडली.
काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात लोकांनी देशमुख यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यात देशमुख हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ पुढील उपचारासाठी आधी काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले. नंतर नागपूरकडे नेण्यात येत असल्याची माहिती देशमुख यांच्या निकटवर्तीयानी दिली.