वेध गडांचे, हात सामाजिक बांधिलकीचे:त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त चंद्रकोर ट्रेकर्सची 'बोपदेव माथा ते जगदीश्वर मंदिर रायगड माथा' पायी भटकंती

2 hours ago 1
त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त चंद्रकोर ट्रेकर्सच्या वतीने बोपदेव माथा ते रायगडातील जगदीश्वर मंदिर माथा अशी पायी भटकंती करण्यात आली. ही भटकंती एकूण 96 किलोमीटरची होती. ट्रेकर्सनी 14 नोव्हेंबर रोजी रात्री पायी प्रवास सुरू केला. तर 17 नोव्हेंबर रोजी रायगडातील जगदीश्वर मंदिर गाठले. या भटकंतीमध्ये रत्नाकर भामरे, प्रसाद कुलकर्णी, प्रमोद माने, गणेश पिलाणे यांचा सहभागी झाले होते. 'बोपदेव - कात्रज माथा - सिंहगड - राजगड - तोरणा - गेळगाणी - मोहरी - बोराटा नाळ उतराई - रायगड माथा जगदीश्वर मंदिर' असा हा प्रवास करण्यात आला. या भटकंतीबाबत सांगताना ट्रेकर्स म्हणाले की, सदर भटकंतीत सिंहगड माथा सोडला तर कुठेही बॅकअप किंवा सपोर्ट टीम स्पॉट ठेवले नाही. पण राजगड पायथा जेवणसाठी थांबलो होतो. याठिकाणी जेवणात प्यायला घट्ट डाळ होती. तर गेळगाणी येथे लिंबू सरबत, गुळ पाणी, डाळ तसेच ताक घेतले. कारण पुढील अंतर कापण्यासाठी ते उपयोगी पडते. 15 तारखेला ढगाळ वातावरण असल्याने भरपूर फायदा झाला. पण 16 तारखेला मात्र चांगलच ऊन होते. कोकणात उतरल्यावर दुपारी 3 ते 5 मध्ये देवाने सूर्याभोवती ढग धरून शेवटचे रटाळ टार रोड चालीचे अंतर कापायला मदत केली. संपूर्ण भटकंतीत 3 किमी / तास अशी ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रमोद माने हे ग्रुपचे सपोर्ट टीम मेंबर होते. त्यामुळे ते सिंहगड माथ्यापासून चमूसोबत सहभागी झाले होते. यावेळी राजगड माथा ते रायगड माथा आमच्यासोबत एका भुभूने सुद्धा भटकंती केली. या भटकंतीत संदिप चौगुले, सचिन चौगुले, प्रशांत वाजगे, गणेश बारटक्के, समीर कुडले यांची भरपूर मदत झाली. या भटकंतीमध्ये प्रमोद माने हे ग्रुपचे सपोर्ट टीम मेंबर होते. ते सिंहगड माथ्यापासून चमूसोबत सहभागी झाले. यावेळी राजगड माथा ते रायगड माथा आमच्यासोबत एका भुभूने सुद्धा भटकंती केल्याचे ट्रेकर्सनी सांगितले. या भटकंतीत संदिप चौगुले, सचिन चौगुले, प्रशांत वाजगे, गणेश बारटक्के, समीर कुडले यांची मदत झाली. भटकंतीचा सविस्तर मार्ग पुढीलप्रमाणे "बोपदेव घाट माथा - काशिविश्वेश्वर मंदिर आस्करवाडी - कात्रज घाट वाघजाई मंदिर - हत्ती डोंगर - नवरानवरी खिंड (धायरी फाटा) - वनचौकी सिंहगड - पुणे दरवाजा सिंहगड - अमृतेश्वर मंदिर - विंझर गाव - गुंजवणी नदी पात्र ओलांडून साखर गाव - गुंजावणे गाव - राजगड माथा (पद्मावती मंदिर) - आळु दरवाजा संजीवनी माची - भुतोंडे खिंड - राजगड तोरणा धारेवर - बुधला माची - वाळंजाई दरवाजा - वाळंजाई देवी - म्हसोबा देवस्थान - सापळ्याची खिंड - गेळगाणी - मोहरी - बोराटा नाळ उतराई - लिंगाणा नाळ उतराई - लिंगाणा माची - पाने गाव - वारंगी गाव - रायगड पायथा - नाणे दरवाजा - महादरवाजा - जगदीश्वर मंदिर रायगड - रायगड पायथा" भटकंतीसाठी 45 ते 60 दिवस घेतली मेहनत सदर भटकंतीसाठी ट्रेकर्सकडून 45 ते 60 दिवस मेहनत घेण्यात आली. यामध्ये व्यायाम, वजन कंट्रोलवर विशेष लक्ष दिले. अशा भटकंतीचे फायदे ते पूर्ण करण्यासाठी लागलेल्या प्रक्रियेमध्ये असतात आणि ते केल्याशिवाय समजवता येत नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकोर ट्रेकर्सनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article