शनिदेवांचा अडीच वर्षांचा कालावधी मार्च 2025 मध्ये पूर्ण होत आहे. द्रिक पंचांगानुसार शनिदेव 29 मार्चला रात्री 10 वाजून 7 मिनिटांनी मीन राशीत बसणार आहेत. म्हणजेच कुंभ राशीला शेवटचा टप्पा, तर मेष राशीला पहिला टप्पा सुरु होणार आहे. पण शनिदेवांच्या या गोचरामुळे मीन राशीत राहुसोबत युती होणार आहे. मीन राशीत शनि आणि राहु जवळपास 30 वर्षांनी एकत्र येणार आहे. दोन्ही ग्रह पापग्रह आहेत. त्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती जातकांना त्रासदायक ठरणार यात शंका नाही. या दोन्ही ग्रहांच्या युतीला ज्योतिषशास्त्रात महाकष्टकारी पिशाच युती असं संबोधलं जातं.त्यामुळे राशीचक्रात या युतीचा फटका बसणार यात शंका नाही. जातकांच्या राशीत अनेक उलथापालथ होतील यात शंका नाही. शनि आणि राहुची युती 29 मार्चपासून 18 मे पर्यंत असणार आहे. त्यानंतर राहु मीन राशीत कुंभ राशीत प्रवेश करेल. 18 मे 2025 रोजी संध्याकाळी 4.30 वाजता राशी बदल करताच ही युती संपुष्टात येईल. पण जवळपास 50 दिवस महाकष्टकरी पिशाच योगाचा सामना करावा लागेल. खासकरून तीन राशीच्या जातकांना त्रास होईल.
या तीन राशीच्या जातकांना बसणार फटका
मीन : या राशीतच राहु आणि शनिची युती होत आहे. त्यामुळे जीवनात उलथापालथ होणार यात शंका नाही. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. नोकरी आणि व्यवसायात सावधपणे पावलं उचलणं गरजेचं आहे. एखादा चुकीचा निर्णय महागात पडू शकतो. वरिष्ठांसोबत वाद होईल अस वागू नका. वैवाहिक जीवनातही अडचणी येऊ शकतात.
मकर : या राशीच्या जातकांनाही या महाकष्टकारी योगाचा फटका बसू शकतो. त्यामुळे या 50 दिवसांच्या कालखंडात काळजी घ्यावी. आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास करताना काळजी घ्या. या कालावधीत राहु संभ्रमात टाकू शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या. खासकरून या कालावधीत नामस्मरण जास्तीत जास्त प्रमाणात करा.
कन्या : या राशीच्या सप्तम स्थानात हा योग तयार होत आहे. त्यामुळे पती पत्नीमध्ये वाद होतील. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. एखादा वाद टोकाला जाऊन घटस्फोटाचं कारण ठरू शकते. त्यामुळे सामंजस्यपणे वागा. पार्टनरशिपचा व्यवसाय असेल तर विशेष काळजी घ्या. भागीदाराकडून दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)