एकनाथ खडसे यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. file photo
Published on
:
18 Nov 2024, 12:30 pm
Updated on
:
18 Nov 2024, 12:30 pm
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिले आहेत. तसेच रोहिणी खडसे यांना निवडून द्यावे. आपण जसे मला सहकार्य केले, तसे रोहिणीताईंना करून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, ही विनंती, अशी पोस्ट राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
मी तुमच्या सुख दुःखात सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडली आहे. तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार, हे तो ईश्वरच ठरवेल. पुढील निवडणुकीत कदाचित मी असेल किंवा नसेल. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे की, आपण रोहिणी खडसे यांना निवडून द्यावे. आपण जसे मला सहकार्य केले, तसे रोहिणीताईंना करून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे.