जिल्ह्यात २८ ऑक्टोंबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान २० दिवसाच्या दिवाळी सुट्ट्या
हिंगोली (Diwali holiday) : चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्राची परीक्षा सध्या सुरू आहे. २८ ऑक्टोंबर ते १६ नोव्हेंबर या दरम्यानच्या कालावधीत २० दिवसाच्या सुट्ट्या दिवाळी निमित्त मिळणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाप्रमाणे २७ ऑक्टोंबरपूर्वी प्रथम सत्र परीक्षा संपविण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या तोंडी, प्रात्यक्षिक, सराव परीक्षा सुरू असून सर्व शाळांच्या प्रथम सत्र परीक्षा संपतील असे नियोजन करण्यात आले आहे.
१८ नोव्हेंबरपासून शाळा पूर्ववत सुरू होणार
त्यानिमित्ताने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने यापूर्वीच उन्हाळी, (Diwali holiday) दिवाळी सुट्टीबाबत नियोजन केले आहे. त्या निमित्त २८ ऑक्टोंबर पासून दिवाळीच्या सुट्ट्यांना सुरूवात होणार आहे. या सुट्ट्या १६ नोव्हेंबर पर्यंत एकूण २० दिवसाच्या मिळणार आहेत. १७ नोव्हेंबरला रविवार असल्याने १८ नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू होणार आहेत. या संदर्भात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्य, मुख्याध्यापकांना यापूर्वीच लेखी पत्राद्वारे या सुट्ट्यांबाबत माहिती देण्यात आली आहे. अनेकजण दिवाळी सुट्टी निमित्ताने आपापल्या गावी जात असतात. तब्बल २० दिवस दिवाळी सुट्ट्यांचा आनंद लुटावयास मिळणार आहे. सध्या प्रथम सत्र परीक्षा सुरू असून विद्यार्थी परिक्षांत मग्न आहेत. परीक्षा होताच दिवाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत.