Dussehra festival: श्री बालाजी संस्थानच्या दसरा महोत्सवाला प्रारंभ

1 hour ago 1

शनिवार १२ ऑक्टोबर रोजी रथोत्सव

परभणी/गंगाखेड (Dussehra festival) : तिरूपती बालाजीचे उपपीठ आसलेल्या गंगाखेड येथील श्री बालाजी संस्थानच्या वतीने साजरा केला जाणाऱ्या दसरा महोत्सवाला प्रारंभ झाला असून याची तयारी पूर्ण झाली आहे. घटस्थापनेपासून ते कोजागीरी पोर्णिमेपर्यंत श्री बालाजी मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जात असल्याने दरदिवशी मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी होत आहे. नवरात्र महोत्सवाचे ९ दिवस वेगवेगळ्या वाहनातून श्री बालाजी मुर्तीची गाव प्रदक्षिणा केली जाते.

दक्षिण गंगा गोदावरी नदीच्या काठावर आसलेल्या गंगाखेड शहरातील तिरूपती बालाजीचे उपपीठ श्री बालाजी संस्थानच्या दसरा महोत्सवास सुमारे पाचशे वर्षाची परपंरा आहे. आंध्र प्रदेशातील तिरूपती तिरूमलाचे उपपीठ म्हणुन दर्जा मिळविलेल्या गंगाखेड येथील बालाजी मंदिरात तिरूपतीच्या धर्तीवरच दरवर्षी दसरा महोत्सव साजरा केला जातो.
गंगाखेड येथील बालाजी मंदिरामध्ये श्री बालाजीची १५ फुट उंचीची वालुकामय मूर्ती असुन शेजारी श्री गोंविदाराज यांची निद्रा अवस्थेत आसलेली मुर्ती आहे. प्राचीन कालीन या बालाजी मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रम सुरूच आसतात पण नवरात्री दरम्यान घटस्थापनेपासून ते कोजागिरी पोर्णिमेपर्यंत दसरा महोत्सव साजरा केला जातो.

घटस्थापनेपूर्वी श्री गणपतीची व विड्याची पालखी काढून पुजन करीत दसरा महोत्सवाला सुरूवात केली जाते. शहरातील चौधरी, दलाल, शेटे, महाजन, पाठक, रणसिंग, लव्हाळे, राजेंद्र, दासरवाड, तमखाने आदी परिवार हे रथोत्सवाचे मानकरी असल्याने त्यांना मानाचा विडा दिला जातो व कोजागीरी पौर्णिमेपर्यत चालणाऱ्या दसरा महोत्सवाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांच्याकडे दिल्या जातात. घटस्थापनेच्या दिवशी श्री बालाजी मंदिरात घटस्थापना करून विविध वाहनातून श्री बालाजी मुर्तीची नगर प्रदक्षिणा केली जाते. दि. ३ ऑक्टोबर रोजी पासून ते दि. ११ ऑक्टोबर पर्यंत दरदिवशी निघणाऱ्या वाहनामध्ये ध्वजा वाहन, नाग वाहन, मोर वाहन, वाघ वाहन, गजांत वाहन, श्री पालखी, अंबारी हत्ती वाहन, सुर्य वाहन, चंद्र वाहन, मारोती वाहन, गरूड वाहनाचा समावेश आहे.

श्री बालाजीचे वाहन वाहून नेण्याचे काम भोई समाज बांधव मोठ्या भक्ती भावाने गेल्या अनेक पिढ्यापासुन करत आहेत. दि. १२ ऑक्टोबर शनिवार रोजी विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी सकाळी १० वाजता लहान लाकडी रथातुन श्री बालाजी मुर्तीची गरुड खांबा भोवती पाच प्रदक्षिणा घेवून रथोत्सवाला प्रारंभ करून दुपारी ३ वाजता सजविलेल्या लाकडी रथातुन व्यंकट रमणा गोंविदा, गोंविदाच्या जयघोषात दूर दूरवरून शहरात आलेले हजारो भक्त गण दोरखंडाच्या साहाय्याने मनोभावे रथ ओढुन रथ परीक्रमेला सुरुवात करतात हा रथ श्री बालाजी मंदिर येथुन निघत पानवेस, तारू मोहल्ला, शनीमंदिर, डॉ. आंबेडकर नगर, बस स्टँड रोड, दिलकश चौक, राज मोहला, श्री जनाबाई मंदिर, गोदातट मार्गे श्री बालाजी मंदिर परिसरात पोहचतो या परिक्रमेदरम्यान मानाच्या ठिकाणी रथावर जावून भाविक भक्त मनोभावे श्री बालाजीची आरती करतात.

रथोत्सवात सहभागी भाविकांना विविध सामाजिक संघटना तसेच व्यापारी बांधवांच्या महाप्रसादाचे वाटप केल्या जाते. कोजागीरी पोर्णीमेच्या उत्सवानंतर दसरा महोत्सवाची सांगता करण्यात येते. श्री बालाजी देवस्थानचे पुजारी गोपाळदेव रामचंद्र खारकर, नंदकुमार महाराज खारकर, माणिक महाराज खारकर, चंद्रकांत महाराज खारकर, सुधीर महाराज खारकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते दसरा महोत्सवासाठी परिश्रम घेत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article