महाड विधानसभा मतदारसंघात आमदार भरत गोगावले यांच्यासमोर स्नेहल जगताप यांचे आव्हानPudhari News network
Published on
:
21 Nov 2024, 6:37 am
Updated on
:
21 Nov 2024, 6:37 am
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या महाड विधानसभेच्या आज झालेल्या निवडणुकीत सुमारे 70 टक्के मतदान झाल्याची प्रार्थमिक माहिती प्राप्त झाली आहे, या ठिकाणी शिवसेनेचे प्रतोद विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले यांची लढत महाविकास आघाडीच्या महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या समवेत असून ही लढत काटे की टक्कर ठरेल अशी शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत.
बुधवार (दि.20) सकाळी सात वाजल्यापासूनच महाड पोलादपूर व माणगाव येथे विशेष करून महिलांनी सकाळी लवकर मतदान करण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावण्याचे चित्र पहावयास मिळाले. दुपारी बारा ते दोन दरम्यान मतदानाशी आकडेवारी घसरली असली तरीही दुपारनंतर झालेल्या मोठ्या मतदानाने हा आकडा सुमारे 70 टक्के पर्यंत पोहोचण्याची माहिती प्राप्त झाली आहे.
भारतीय लोकशाहीची सर्वोच्च ताकद म्हणून ओळखल्या जाणार्या मतदान प्रक्रियेमध्ये महाडमध्ये नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आमदार भरत शेठ गोगावले व स्नेहल जगताप यांनी नागरिकांना धन्यवाद दिले आहेत प्राप्त झालेल्या माहितीनुसार सर्व मतदार केंद्रांवर मतदान शांततेत व व्यवस्थित संपन्न झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. काही ठिकाणच्या अपवादात्मक घटना वगळता ईव्हीएम मशीन योग्य पद्धतीने कार्यरत राहिल्यानेच मतदान प्रक्रिया सुरळीत संपन्न झाल्याचे मत राजकीय निरीक्षक व्यक्त करीत आहेत
मतदारसंघातील या निवडणुकीमध्ये आमदार भरत गोगावले यांच्यासमोर स्नेहल जगताप यांनी उभे केलेले आव्हान आता मतपेटीमध्ये बंद झाले असून या संदर्भातील निकाल 23 नोव्हेंबर रोजी जनतेसमोर उघडला जाईल. बुधवार (दि.20) सकाळी आमदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या घराशेजारील मतदान केंद्रावर सहकुटुंब उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला तर स्नेहल जगताप यांनी शाळा क्रमांक पाच येथे आपले पती व घरातील सदस्यांसमवेत मतदान केले. ा मतदारसंघाच्या निकालाचे पडसाद आगामी काळात रायगडच्या राजकारणावर परिणामकारक ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत. यामुळेच बुधवार (दि.20) झालेल्या वाढत्या टक्केवारीचा फायदा कोणत्या उमेदवाराला होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.