Gangakhed police Crime: अबब…पित्याच्या वादग्रस्त पोस्टमुळे मुलास झाली मारहाण

2 hours ago 1

परभणीच्या गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

गंगाखेड (Gangakhed constabulary Crime) : सोशल मिडियावर पित्याने वायरल केलेल्या पोस्टमुळे मुलास मारहाण झाल्याची घटना गुरुवार रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील माजी नगरसेवक अर्जुन पुरनाळे यांनी सोशल मिडियावर वादाग्रस्त पोस्ट वायरल केल्याची घटना गुरुवार दुपारी घडली होती. सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास चार अनोळखी व्यक्तींनी अथर्व अर्जुन पुरनाळे वय २० वर्ष यास रस्त्यात अडवून तुझ्या वडिलांनी आमच्या समाजाबाबत वादग्रस्त पोस्ट केली असे म्हणत बेल्ट व वायरने मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी अथर्व अर्जुन पुरनाळे वय २० वर्ष रा. लेक्चर कॉलनी गंगाखेड यांनी दिल्यावरून (Gangakhed constabulary Crime) पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार गौस खान पठाण, पो. शि. सुनील मामीलवाड हे करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article