Hingoli Assembly Election: हिंगोली काँग्रेसची जागा ‘दिल्ली-८८’मध्ये

2 hours ago 1

हिंगोली (Hingoli Assembly Election) : विधानसभेच्या जागा वाटपा संदर्भात मविआमध्ये ओढाताण होत असलेल्या ८८ जागांमध्ये (Hingoli Congress) हिंगोलीच्या जागेचाही समावेश असल्याची माहिती आघाडीच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. ही जागा आघाडीमध्ये काँग्रेसकडे होती.

काँग्रेस पक्षाची विधान सभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. सगळ्यात आधी उमेदवारी जाहीर करण्याचा बहुमान (Hingoli Congress) काँग्रेसने यावेळी पटकावला असला तरी खर्‍या अर्थाने ओढाताण सुरू असलेल्या जागांची यादी दिल्लीला गेली असून याबाबत अंतीम निर्णय व्हायला वेळ लागणार असल्याचा अंदाज आहे. हिंगोलीची जागा आघाडी अंतर्गत काँग्रेस पक्षाकडे असली तरी पक्ष मात्र प्रचंड गटबाजीने ग्रासलेला आहे. (Hingoli Assembly Election) पक्षातून पाच प्रमुख नेत्यांनी या जागेवर दावा केला आहेच. शिवाय अन्यही अनेक इच्छुक आहेत. या स्पर्धेमुळे उमेदवारी काँग्रेसला मिळाली तर अंतर्गत विरोध मोठ्या प्रमाणावर होईल या भितीपोटी पक्षाच्या राज्यातील नेत्यांनी दिल्लीला पाठविलेल्या ८८ जागांच्या यादीत हिंगोलीला टाकले आहे. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर या जागेचे प्रमुख दावेदार आहेत; परंतु ते दोन वेळा पराभूत झालेले असल्याचे सांगून सचिन नाईक, सुधीर अप्पा सराफ, प्रकाश थोरात, शामराम जगताप गुरूजी यांसह इतरांनीही या जागेवर दावा केला आहे.

उबाठा शिवसेनेत हालचाली वाढल्या

उबाठा शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत आघाडी झाली असल्याने हिंगोलीची जागा शिवसेनेकडे घेऊन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांना उमेदवारी देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी चालवली आहे. असे असले तरी जागा शिवसेनेकडे जाण्याची शक्यता दिसताच बाजार समितीचे सभापती राजेश पाटील गोरेगावकर या जागेसाठी सक्रिय झाले असून रूपाली पाटील गोरेगावकर यांच्या (Hingoli Assembly Election) उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू झाल्याचे राजकीय गोटातून समजते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article