Hingoli former corporator: माजी नगरसेवकाची फसवणूक; विक्री केलेल्या जागेची परस्पर बक्षिस पत्र

2 hours ago 1

हिंगोली (Hingoli erstwhile corporator) : शहरातील माजी नगरसेवकास विक्री केलेल्या जागेचे आरोपीने परस्पर आपल्या मुलाच्या नावे बक्षिस पत्र करून फसवणूक केल्याने हिंगोली शहर पोलिसात आरोपी पिता-पुत्राविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, हिंगोली शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक कमलेश कांताप्रसाद जैस्वाल यांनी विनोद गणेशलाल जैस्वाल यांच्याकडून जवळा-पळशी रस्त्यावरील बांधलेली इमारत विकत घेण्यात आली होती; परंतु विनोद जैस्वाल याने त्यांचा मुलगा यश विनोद जैस्वाल याच्या नावावर ८ जुलै रोजी रजिस्टर कार्यालयात बक्षिस पत्र करून दिले; परंतु या जागेचे बक्षिस पत्र करून देत असताना विनोद जैस्वाल यांचा मुलगा यश जैस्वाल यास सदर जागा माजी नगरसेवक कमलेश जैस्वाल यांना विक्री केलेली माहिती असतानाही ती जागा यश जैस्वाल याने स्वत:च्या नावावर बक्षिस पत्र करून घेतले.

सदर जागेची भूमिअभिलेख कार्यालयात यश विनोद जैस्वाल यांच्या नावाने पीआर कार्ड करून घेतले. विनोद जैस्वाल व त्यांचा मुलगा यश जैस्वाल या दोघांनी संगणमत करून माजी नगरसेवक कमलेश जैस्वाल यांना न विचारता परस्पर बक्षिस पत्र करून दिले. तसेच बक्षिस पत्र करून घेऊन कमलेश जैस्वाल यांची फसवणूक केल्याने १८ ऑक्टोंबर रोजी हिंगोली शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून विनोद गणेशलाल जैस्वाल व त्यांचा मुलगा यश विनोद जैस्वाल रा.हिंगोली या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी.एल.गंधकवाड हे करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article