– जीएसटी कार्यालयातील लाचखोरी उघड
– दोन महिन्यात लाचखोरीचे चार गुन्हे दाखल
– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक विकास घनवट यांच्या पथकाची कामगिरी
हिंगोली (Hingoli GST office) : कुरूंदकर फार्मस प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड या नावाने नोंदणीकृत असलेल्या कंपनीने व्यवसायासाठी जीएसटी रिर्टन दाखल न केल्याची नोटीस बजावून त्यांना हजर राहण्याबाबत कळविले होते. जीएसटी रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी वरिष्ठाकडे पाठविण्या बाबत कंपनीला दम देऊन १० हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून सदर रक्कम स्विकारताना जीएसटी कार्यालयातील अधिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहात पकडले.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने दिलेली माहिती अशी की, कुरूंदकर फार्मस प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड या नावाने नोंदणीकृत कंपनी असून केळीचे चिप्स बनवून विक्री करण्याचा व्यवसाय केला जातो. या कंपनीच्या नावाने व्यवसायासाठी (Hingoli GST office) जीएसटी रजिस्ट्रेशन क्रमांक देखील घेण्यात आलेला आहे. सदर व्यावसायिकाने मागील सहा महिन्यापासून कंपनीचे जीएसटी रिर्टन दाखल न केल्याने ७ ऑक्टोंबर रोजी कंपनीच्या मेलवर जीएसटी कार्यालयाकडून सिस्टीज जनरेटर नोटीस प्राप्त झाली होती. त्यामध्ये शो कॉस नोटीस फॉर कॅन्लेशन ऑफ रजिस्ट्रेशन असे नमूद करून ४ नोव्हेंबरला हजर राहण्या बाबत कळविले होते.
त्यानंतर ५ नोव्हेंबरला (Hingoli GST office) जीएसटी हिंगोली कार्यालयातील अधिक्षक मनोज मगरे यांनी तक्रारदारास फोनद्वारे तुमच्या कंपनीचे जीएसटी रिर्टन दाखल केले नसल्याने कंपनीचे जीएसटी रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे. रजिस्ट्रेशन रद्द करावयाचे नसल्यास हिंगोलीतील जीएसटी कार्यालयात येऊन भेटा, असे सांगितले. त्यावरून तक्रारदाराने ऑनलाईन पद्धतीने जीएसटी रिर्टन भरून त्यावरील दंडाची रक्कम देखील भरून घेतली. त्यानंतर तक्रारदाराच्या कंपनीच्या मेलवर जीएसटी कार्यालयाकडून जीएसटी रिर्टन भरल्याबाबत व ७ ऑक्टोंबर रोजीची नोटीस रद्द करण्याबाबत ८ नोव्हेंबर रोजी जीएसटी कार्यालयाकडून सिस्टीम जनरेटर ऑर्डर प्राप्त झाली.
त्यामुळे तक्रारदार (Hingoli GST office) जीएसटी कार्यालयात मनोज मगरे यांना भेटण्यास गेले नाही. २२ नोव्हेंबरला अधिक्षक मनोज मगरे यांनी तक्रारदारास फोन करून तुम्ही भेटण्यास नाही तर जीएसटी रजिस्ट्रेशन रद्द करण्यास वरिष्ठाकडे पाठवतो, असे म्हणून १० हजाराच्या लाचेची मागणी केली. ही लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदाराने २२ नोव्हेंबरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता त्याची शासकीय पंचाक्षम पडताळणी केली. त्यावरून २५ नोव्हेंबरला हिंगोलीतील रामाकृष्णा लॉजच्या खाली असेलल्या दराडे यांच्या हॉटेलमध्ये दुपारी २.३० वाजता सापळा रचला.
ज्यामध्ये १० हजाराची लाच तक्रारदाराकडून स्विकारताना (Hingoli GST office) जीएसटी कार्यालयातील वर्ग २ अधिक्षक मनोज मधुर मगरे याला पथकाने रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार, हिंगोली पोलीस उपाधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, विनायक जाधव, सपोउपनि महंमद युनूस, विजय शुक्ला, तान्हाजी मुंढे, रविंद्र वर्णे, ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलिक, गोविंद शिंदे, गजानन पवार , राजाराम फुफाटे, योगिता अवचार, शिवाजी वाघ यांनी हा सापळा यशस्वी केला.
एसीबीचे पोलीस उपाधीक्षक विकास घनवट यांनी पदभार स्विकारल्याच्या दोन महिन्यात लाच प्रकरणात चार सापळे यशस्वी केले. ज्यामध्ये तिघांना रंगेहात पकडले तर एकाला लाचेची मागणी केल्यावरून गुन्हा दाखल केला.