Hingoli: जिल्हाधिकारी परिसरात सात कलमी कार्यक्रमांतर्गत स्वच्छता श्रमदान

2 hours ago 1

हिंगोली (Hingoli):-  मुख्यमंत्री(chief Minister) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्या शंभर दिवसात विविध अशा सात कलमी कार्यक्रमांतर्गत आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता श्रमदान कार्यक्रम घेण्यात आला.

अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता श्रमदान कार्यक्रम

यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी ही मोहिम जिल्ह्यातील सर्व कार्यालयामध्ये राबविण्यात येणार आहे. सात कलमी कार्यक्रमांतर्गत यानंतरही कार्यालय व परिसर स्वच्छता कार्यक्रम मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आतील व बाहेरील परिसरात जिल्हा प्रशासन व हिंगोली नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी व जेसीबी मशीनच्या सहायाने मोठ्या प्रमाणात कचरा काढण्यात आला. त्यामुळे हा परिसर स्वच्छ दिसत आहे. काही कर्मचाऱ्यांनी जेसीबीचा आधार घेत प्रशासकीय इमारतीच्या खिडकीवर चढून स्वच्छता केली.

कर्मचाऱ्यांनी जेसीबीचा आधार घेत इमारतीच्या खिडकीवर चढून केली स्वच्छता

यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, मुख्याधिकारी अरविंद मुंडे, उपनगर अभियंता प्रतीक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील जवळपास दीडशे ते दोनशे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  या मोहिमेसाठी हिंगोली नगर परिषदेच्या वतीने सफाईगार कर्मचारी, जेसीबी, कचरा वाहून नेणारे वाहन आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article