Hingoli: दसरा महोत्सवात आकाश पाळणे व इतरांचे दर वाढल्याने चिमुकल्याचा आनंद हिरावला

2 hours ago 1

हिंगोली (Hingoli) :- दसरा मोहत्सवात लहान, मोठ्यासाठी आकाश पाळणे सह इतर साहित्य आनंद लुटण्यासाठी उभारले आहेत याचे तिकिटाचे दर प्रत्येकी 80 रुपये ठेवण्यात आल्याने चिमुकल्यांचा आनंद हिरावला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दुकाने, मनोरंजन खेळणी यातून सव्वा कोटी रुपयांचा महसूल मिळाला

दसरा मोहत्सव समितीला यंदा प्रदर्शनीतून दुकाने, मनोरंजन खेळणी यातून सव्वा कोटी रुपयांचा महसूल (revenue) मिळाला आहे. यामध्ये हा ऐतिहासिक दसरा मोहत्सव गुरुवारी सुरु झाला असून तेरा ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. या दसरा मोहत्सवात कृषी व औद्योगिक प्रदर्शनी हे मुख्य आकर्षण असते. यातून जमा झालेला महसूल यामधून कार्यक्रमावर खर्च केला जातो. अन उरलेली रक्कम समितीच्या खात्यात जमा केली जाते. दरम्यान, यावेळी समितीने 200 स्टॉल मधून चाळीस लाखाचा महसूल मिळाला. तर मोठे आकाश पाळणे आणि अन्य मनोरंजन साधनातून 65 लाखाची रक्कम मिळाली.

प्रत्येकी 80 रुपयांचे तिकीट दर आकारले जात

या ऐतिहासिक दसरा मोहत्सवात मोठ्या व लहान मुलासाठी मनोरंजन व्हावे, आनंद लुटता यावा यासाठी आकाश पाळणे, ब्रेक डान्स, फ्लायिंग डान्स, हातोडा, बोट यांच्यात बसण्यासाठी लहान, असो की मोठे व्यक्ती यांना प्रत्येकी 80 रुपयांचे तिकीट दर आकारले जात आहे. यामुळे लहान मुलांचा आनंद हिरावून घेतला जात आहे. मागील वर्षी समितीने मोठ्या मनोरंजन साहित्याना पन्नास तर लहान मनोरंजन पाळण्याना तीस रुपये या प्रमाणे दर आकारले जात असताना यंदा मात्र सर्वच मनोरंजन पाळण्याना सरसकट 80 रुपयांचा दर आकारल्या जात असल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. तातडीने दर कमी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article