वसमत(Hingoli):- वसमत नांदेड रस्त्या वरील गिरगाव फाट्याजवळ मोटरसायकल व बसचा अपघात (Accident)झाला दुचाकीस्वार ठार झाला आहे तर मृतकाची पत्नी गंभीर जखमी झाली आहे जखमीला नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
मृतकाची पत्नी गंभीर जखमी
वसमत ते नांदेड रस्त्यावर दुचाकीवरून कुंडलिक उन्हाळे राहणार दांडेगाव व त्यांची पत्नी मोटरसायकल वरून नांदेड कडे जात होते. गिरगाव फाट्याजवळ दुचाकी क्रमांक एम.एच.३८-ई.६७३६ ला बसने धडक दिली. बस क्रमांक एम.एच.१३-सी.यू.७५३७ यातील मोटर सायकल चालक कुंडलिक उन्हाळी रा. दांडेगाव (६५) हे ठार झाले आहेत तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी (Injured)असून त्यांना उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे जमादार गोरे व कर्मचारी दाखल झाले होते.