महिला अत्याचाराविरोधात एकत्र या:विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलम गोर्‍हे यांचे आवाहन

2 hours ago 1
महिलांवर होणारे अत्याचार हा विषय फक्त पोलिसांपूर्ता मर्यादित नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येवून काम करण्याची गरज असल्याचे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले. शहरातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍या सोबत बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. गोर्‍हे बोलत होत्या. यावेळी बोलताना डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, या प्रकरणात कोणाचाही राजीनामा मागण्याची गरज नाही. पुणे मुंबई पोलिसांची कीर्ती अतिशय चांगली आहे. बोपदेव घाटात पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी. तसेच तेथील पोलिस चौकी कार्यवयीत करण्यात यावी. त्याठिकाणी विद्युत दिवे लावण्याच्या सुचन्या दिल्या आहेत. बोपडेव घाट बरोबर दिवे घाट वेताळ टेकडी, एनडीए परिसर सारख्या निर्जन भागात पोलीस सरक्षण, गस्त देण्याचा निर्णय पोलिसांशी घेतला असल्याचे सांगितले. महिला दक्षता समित्त्याची बैठक होत आहे मात्र त्याची फलनिष्पती काय झाली. केलेल्या तक्रारीचा निपटारा कसा केला. याचा अहवाल तयार करावा. महिलांनी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीचा योग्य निपटारा झाला तर पुढे घडणारे गुन्ह्यावर आताचा नियंत्रण मिळू शकते. भरोसा सेल, ज्येष्ठ नागरिक कक्ष आदी कसे काम करत याची ओळख सर्वसामन्य नागरिकांना करुन देऊन हे कक्ष कसे क्रियाशील होतील याकडे लक्ष द्यायला असेही त्यांनी यावेळी सांगितले. व्हॅन चालकाची पडताळनी करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी शालेय शिक्षण आणि परिवहन विभाग यांची बैठक घेतली आहे. पर्यंतू शाळांकडून काही कार्यवाही होत नसेल तर शिक्षण संचालक, परिवहन विभाग यांच्या बरोबर बोलून स्कुल व्हॅन चालकांची चारित्र्य पडताळणी करण्याचा सुचना डॉ. गोर्‍हे यांनी यावेळी केल्या. गृहमंत्र्याच्या राजीनाम्याची गरज नाही पूर्वीचे सरकारला सुद्धा राजीनामाची मागणी वारवार होत होती. काही वेळा गृहमंत्री सुद्धा बदलावे लागले आहेत. मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्र्याकडून कुठलीही चुक झाली नसल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्धभवत नसल्याचे डॉ. गोर्‍हे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article