सध्या लग्नाचा सीजन सुरू आहे. रोज कुठे ना कुठे सनई चौघड्यांचे सूर ऐकायला येतात. अनेकजण लग्नानंतर बाहेर फिरायला जाण्याचा प्लान करत आहेत. कुठे कुठे जायचे आणि कुठे नाही याची यादीही करताना दिसत आहेत. क्वालिटी टाइम स्पेंड व्हावा आणि संवाद निर्माण व्हावा म्हणून नव दाम्पत्य हनीमूनसाठी जात असतात. काही लोक आपल्या राज्यातच फिरायला जातात. काही लोक देशातील इतर राज्यात जाणं पसंत करतात तर काही लोक परदेशातही हनीमूनसाठी जातात. प्रत्येकजण आपल्या बजेटनुसार हनीमूनला जाण्याची ठिकाणं ठरवत असतो. पण भारतात पाच अशा जागा आहेत की तुम्हाला परदेशात जाण्याची गरजच पडणार नाही. नव दाम्पत्यांसाठीचं खास आकर्षण म्हणूनही या ठिकाणांकडे पाहिलं जातं.
ऊटी, तामिळनाडू…
तामिळनाडूच्या नीलगिरी डोंगर रांगांच्या मध्ये ऊटी वसलेलं आहे. ही एक अत्यंत सुंदर जागा आहे. लग्नानंतर अनेकजण ऊटीलाच येण्यावर भर देत असतो. भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोकही ऊटीला येत असतात. ऊटीतील हिरवी वनराई, नद्या, डोंगर रांगा यामुळे कपल्स या शहरात आकर्षित होतात. उटीमध्ये तलाव, रोज गार्डन, नीलगिरी माऊंटेन रेल्वे राइड, कुन्नूर अशा अनेक गोष्टी आहेत. या ठिकाणी बॉलिवूडचेही चित्रीकरण होत असते.
जम्मू- काश्मीर
जम्मू-काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटलं जातं. थंडीच्या दिवसात काश्मीरमध्ये जाणं लोक पसंत करतात. या ठिकाणी डोंगर रांगावर धुक्यांची पसरलेली दुलई खास आकर्षित करत असते. विंटर हनीमून डेस्टिनेशन म्हणूनही जम्मू-काश्मीर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी होणारा हिम वर्षाव अनुभवण्यासाठी लोक एकदा तरी येतातच. जम्मू आणि काश्मीरमध्ये गुलमर्ग, पहलगाम, वैष्णोदेवी मंदिर, सोनमर्ग आदी जागा महत्त्वाच्या आहेत.
दार्जिलिंग, पश्चिम बंगाल
पश्चि बंगालमधील दार्जिलिंग हे हनीमूनसाठीचं महत्त्वाचं डेस्टिनेशन आहे. ही अत्यंत सुंदर अशी जागा आहे. अनेक लोक या ठिकाणी आल्यावर नुसते फोटोच काढतात, इतकी अप्रतिम अशी ही जागा आहे. दार्जिलिंगचं नैसर्गिक सौंदर्य प्रत्येकाला मोहून टाकतं. दार्जिलिंगला गेल्यावर पार्टनरसोबत टॉय ट्रेनमध्ये बसून चहा पित पित चहाचे बगीचे पाहणं, देवदारची जंगलराजी पाहणं, रंगबिरंगी नद्या पाहणं निव्वळ अप्रतिमच. हवामान स्वच्छ असेल तर माऊंट एव्हरेस्टही पाहायला मिळतो.
कुर्ग, कर्नाटक
कर्नाटकातील कुर्गला भारताचा स्कॉटलंडही म्हटलं जातं. म्हणूनच जोडप्यांची कुर्गला सर्वाधिक पसंती असते. कुर्ग समुद्र सपाटीपासून 1525 मीटर उंचावर आहे. अथांग पसरलेल्या निसर्गामुळे पर्यटक आणि कपल्स या ठिकाणी आकर्षित होतात. या ठिकाणी तुम्ही साहसी प्रकारातही भाग घेऊ शकता.
गंगटोक, सिक्कीम
नव दाम्पत्यांसाठी सिक्कीमधील गंगटोक एक परफेक्ट जागा आहे. तुम्ही या ठिकाणी उगवत्या सूर्याला पाहू शकता. या ठिकाणी नद्या आणि दऱ्या पाहण्यासारख्या आहेत. गंगटोकमध्ये नेहमीच कपल्स पाहायला मिळतात. कपल्ससाठी हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे.