Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, ९ ऑक्‍टोबर २०२४

2 hours ago 1

जाणून घ्या तुमच्या राशीत आज काय लिहिलंय? | File Photo

चिराग दारुवाला

Published on

08 Oct 2024, 8:30 pm

Updated on

08 Oct 2024, 8:30 pm

Daily Horoscope Marathi | चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर.

मेष : शेजाऱ्यांशी छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात

Daily Horoscope

मेष File Photo

मेष : श्रीगणेश सांगतात की, काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण करून आज घरातील वातावरण सकारात्मक होईल. प्रलंबित आर्थिक व्‍यवहार पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. शेजाऱ्यांशी छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. याचा तुमच्‍या कुटुंबाला त्रास होईल. इतरांच्‍या समस्‍येमध्‍ये हस्‍तक्षेप करु नका. कामाच्या ठिकाणी काही कारणाने तणाव निर्माण होऊ शकतो. कामामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ देऊ शकणार नाही. तणाव आणि थकवा तुमच्या आरोग्यावर परिणाम करेल.

वृषभ : व्यापारासाठी आजचा दिवस शुभ आहे

Daily Horoscope

वृषभFile Photo

वृषभ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुम्ही तुमचे कार्य एकाग्रतेने आणि उर्जेने पूर्ण कराल. धार्मिक कार्यक्रमाचेही नियोजन कराल. कुटुंबासोबत मनोरंजनासाठी थोडा वेळ व्‍यतित करा. मुलांच्या करिअरबाबत थोडी चिंता असेल. नकारात्मक वातावरणात संयम राखणे फायदेशीर ठरेल. व्यापारासाठी आजचा दिवस शुभ आहे. पती-पत्नी सुसंवाद साधतील. बदलत्या वातावरणाचा आरोग्‍यावर परिणाम होईल.

मिथुन : ग्रहमान अनुकूल, तुमच्या क्षमता आणि उर्जेचा पुरेपूर वापर करा

Daily Horoscope

मिथुनFile Photo

मिथुन : श्रीगणेश सांगतात की, तुमच्‍या महत्त्‍वाच्‍या योजना सुरु करण्‍यासाठी आजची वेळ योग्‍य आहे. ग्रहमान तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. तुमच्या क्षमता आणि उर्जेचा पुरेपूर वापर करा. सामाजिक संस्थांना मदत करण्यातही काही वेळ जाईल. आर्थिक व्‍यवहाराकडे लक्ष द्या. वाहन कर्ज घेण्‍याचा निर्णय विचारपूर्वक घ्‍या. घर आणि व्यवसायात सुसंवाद राखण्यात आनंदी वातावरण राहील. जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो.

कर्क : जवळचे पाहुणे आल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील

Daily Horoscope

कर्कFile Photo

कर्क : श्रीगणेश म्‍हणतात की, आज नवीन काम सुरू होऊ शकते. जवळचे पाहुणे आल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. मुलांच्या अभ्यासासाठी नियोजन फलदायी ठरेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तीला प्रकृतीची काळजी राहील. पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. उष्णतेमुळे डोकेदुखीचा त्रास होवू शकतो.

सिंह : मुलांची आशा पूर्ण न झाल्याने मन निराश होऊ शकते

Daily Horoscope

सिंहFile Photo

सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज काही खास लोकांशी भेटीगाठी होतील. फायदेशीर विषयावर चर्चा होईल. मालमत्ता विक्रीचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. मुलांची कोणतीही आशा पूर्ण न झाल्याने मन निराश होऊ शकते. काळजी करू नका, मुलांचे मनोबल वाढवा. कौटुंबिक वातावरण सामान्य ठेवा. आयात-निर्यात संबंधित व्यापाराला गती मिळू लागेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

कन्या : सध्या कठोर परिश्रमाचे फळ मिळणार नाही

Daily Horoscope

कन्याFile Photo

कन्या : श्रीगणेश सांगतात की, आज सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. आपल्या कृतीबद्दल जागरूक रहा. सध्या कठोर परिश्रमाचे फळ मिळणार नाही; पण आजची मेहनत भविष्यात योग्य फळ देऊ शकते. एखाद्यावर जास्त संशय घेणे हानिकारक ठरू शकते. वैयक्तिक कामामुळे व्यवसायावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण होऊ शकते. आरोग्य उत्तम राहील.

तूळ : कौटुंबिक कामे व्यवस्थित पार पडतील

Daily Horoscope

तूळ File Photo

तूळ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज जनसंपर्काच्‍या सीमा वाढतील. कौटुंबिक कामे व्यवस्थित पार पडतील. अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना काळजी घ्या. आळस टाळा. अन्‍यथा तुमच्या काम करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्हाला घर आणि व्यवसाय दोन्हीमध्ये सुसंवाद राखावा लागेल.

वृश्चिक : जोडीदाराचे सहकार्य तुमचे मनोबल टिकवून ठेवेल

Daily Horoscope

वृश्चिकFile Photo

वृश्चिक : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही तुमच्या प्रतिभा आणि बौद्धिक क्षमतेच्‍या जोरावर यश मिळवाल. समाजात आणि जवळच्या नातेवाईकांमध्येही तुमचा सन्मान वाढेल. भूतकाळातील नकारात्मक गोष्टी पुन्हा समोर येणार नाहीत याची काळजी घ्या, अन्‍यथा यामुळे नाते बिघडू शकते. विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते. व्यावसायिक कामे मंद होतील. जोडीदाराचे सहकार्य तुमचे मनोबल टिकवून ठेवेल. विचारांमधील नकारात्मकतेमुळे थोडे उदासीनता किंवा ताण येऊ शकतो.

धनु : मुलांच्या भविष्यासाठीच्या योजनांमध्ये तुमच्या सहकार्याची गरज

Daily Horoscope

धनुFile Photo

धनु : श्रीगणेश म्‍हणतात की, तुमचा सकारात्मक दृष्टीकोन महत्त्वपूर्ण यश मिळवून देईल. नातेसंबध अधिक दृढ होतील. मुलांच्या भविष्यासाठीच्या योजनांमध्ये तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे. वारशाने मिळालेल्या मालमत्तेत व्यत्यय आल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. भावांसोबतचे संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्‍या. भागीदारीतील व्यापारातील परिस्थिती फायदेशीर ठरेल. पती-पत्नी सुसंवादातून समस्या सोडवू शकतात. पोटविकाराचा त्रास जाणवेल.

मकर : कौटुंबिक बाबींमध्ये ढवळाढवळ होणार नाही याची काळजी घ्या

Daily Horoscope

मकरFile Photo

मकर : श्रीगणेश सांगतात की, कौटुंबिक कामे व्यवस्थितपणे चालवण्यात तुमचे विशेष योगदान असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक बाबींमध्ये ढवळाढवळ होणार नाही याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रात आज एखादा महत्त्वाचा अधिकारी मिळू शकतो. पती-पत्नीचे नाते मधुर होईल. प्रकृतीची काळजी घ्‍या.

कुंभ : व्यावसायिक व्यवहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील

Daily Horoscope

कुंभFile Photo

कुंभ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज भावनेच्‍या आहारी न जाता व्यावहारिक विचार करा. व्यावसायिक व्यवहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका. मार्केटिंग आणि मीडियाशी संबंधित कामात आज वेळ वाया घालवू नका. तणाव तुमच्या कार्यक्षमतेवर आणि मनोबलावर परिणाम करू शकतो.

मीन : तुम्ही तुमच्या कामात आत्मविश्वासाने समर्पित व्हाल

Daily Horoscope

मीनFile Photo

मीन : श्रीगणेश सांगतात की, तुम्ही तुमच्या कामात आत्मविश्वासाने समर्पित व्हाल. कुटुंबासोबत थोडा वेळ व्‍यतित करा. नातेवाईक आणि मित्रांशी चांगले संबंध ठेवा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article