कोरियाला हरवून हिंदुस्थानचे पदक पक्के

2 hours ago 1

हिंदुस्थानच्या महिला टेबल टेनिस संघाने मंगळवारी इतिहास घडविला. त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या दक्षिण कोरियावर 3-2 फरकाने रोमहर्षक विजय मिळवून आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत धडक देत हिंदुस्थानचे पदक पक्के केले. स्पर्धेच्या इतिहासातील हिंदुस्थानचे हे पहिले पदक ठरला आहे, हे विशेष.

आता जपान किंवा सिंगापूरचे आव्हान

हिंदुस्थानी महिला संघाची उपांत्य फेरीत जपान आणि सिंगापूर यांच्यातील विजेत्या संघाशी बुधवारी (दि.9) गाठ पडणार आहे. गतवर्षीच्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत हिंदुस्थानी संघ सहाव्या स्थानावर फेकला गेला होता. पाचव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत त्यांना थायलंडने 3-0 फरकाने हरविले होते, मात्र या वर्षी हिंदुस्थानी महिलांनी पदक पक्के करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.

 अहिका, मनिकाची विजयी सुरुवात

अहिका मुखर्जीने दक्षिण कोरियाविरूद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत विजयी श्रीगणेशा केल्यानंतर कोरियाच्या युबिन शिन हिचा 11-9, 7-11, 12-10, 7-11, 11-7 (3-2) असा पराभव करीत हिंदुस्थानला झकास सुरुवात करून दिली. त्यानंतर स्टार खेळाडू मनिका बत्राने दुसऱ्या लढतीत जिओन जिही हिचा 12-11, 13-11, 11-5, 5-11, 12-10 (4-1) असा पराभव करीत हिंदुस्थानला 2-0 असे आघाडीवर नेले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article