शिवराज्याभिषेक सोहळा; 450 काेटींचा निधी वाया:छत्रपती संभाजीराजे यांचा सरकारवर थेट आरोप

2 hours ago 1
छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ राेजी राज्याभिषेक झाला हाेता. या घटनेस ३५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने राज्य सरकारने ४५० काेटी रुपयांचा निधी राज्यातील किल्ले संर्वधन व जतन आणि विविध किल्लयांवर शिवराज्याभिषेक साेहळयासाठी मंजूर करण्याची घाेषणा केली. परंतु सदर पैसे खर्च करण्यासाठी किल्ले जतनाचे काेणत्याही प्रकारचे अंदाजपत्र किंवा टेंडर प्रक्रिया राबवली न गेल्याने सदर मंजूर झालेले पैसे वर्षभरानंतर एक रुपयाही खर्च झाले नाहीत, असा आरोप स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी केला. संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आपली अस्मिता आहे त्यांचे किल्ले जतन हाेणे आवश्यक आहे. परंतु त्याकडे सरकारचे दुर्लक्ष हाेत आहे. सरकारने शिवराज्याभिषेक साेहळयाचे निमित्ताने ४५० काेटी रुपये किल्ले संर्वधन व साेहळयासाठी देण्याचे जाहीर केले हाेते. मात्र, त्याचा काेणताही वापर अद्याप केला गेला नाही. या निधीचा हिशाेब सरकारने शिवभक्तांना दिला पाहिजे. सरकारचे अधिसूचनेनुसार प्रत्येक जिल्हयातील नियाेजन समितीच्या अर्थसंकल्पापैकी तीन टक्के रक्कम ही स्मारकांवर खर्च झाली पाहिजे. त्यातून सदर भागातील गड, किल्ले, मंदिर, धार्मिक स्थळे विकसित व जतन हाेण्यासाठी मदत हाेऊ शकेल. परंतु त्या निधीचा देखील वापर सध्या केला जात नाही. सरकारने शिवराज्याभिषेक साेहळयाचे निमित्ताने प्रथम निधी मंजूर केला परंतु त्याचे काेणतेच अंदाजपत्रक किंवा टेंडर काढले नसल्याने ते पैसे वाया जाऊन पुन्हा सरकारी खात्यात जमा झाले आहे. राज्यातील किल्ले पर्यटनाचे व इतिहासाचे दृष्टीने महत्वपूर्ण ठेवा असून त्याकडे दुर्लक्ष करणे याेग्य नाही.’ छत्रपती संभाजीराजे यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे हा मुद्दा प्रचारात आणतील, अशी शक्यता आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article