दांडिया नाईटमध्ये थिरकले स्नेहालय व अनामप्रेममधील मुले-मुली, पारंपरिक वेशभुषेतील युवती व महिलांचाही सहभाग

2 hours ago 1
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटमध्ये युवक-युवती दांडियाच्या तालावर थिरकली. पारंपरिक वेशभुषेतील युवती व महिला मोठ्या संख्येने यात सहभागी झाल्या होत्या. तसेच स्नेहालय व अनामप्रेम संस्थेच्या वंचित घटकातील मुला-मुलींना या उत्सवात सामावून घेत त्यांच्यासह नवरात्रीचा आनंद द्विगुणीत करण्यात आला. टिळकरोड येथील नंदनवन लॉन येथे दांडिया नाईटचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी राजेश भंडारी, नयना भंडारी, तेजस गांधी, डॉ. अमोल जाधव, शुभम कटारिया, विशाल लाहोटी उपस्थित होते. जिव्हाळा ग्रुपच्या अध्यक्षा अल्पना कासवा व सचिव सविता काळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. नॉन स्टॉप म्युझिक लाईट, डीजेने रंगत आलेल्या दांडिया नाईटमध्ये पारंपरिक वेशभूषेत महिला व युवक-युवतींच्या ग्रुपने दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. दांडिया नृत्याच्या कार्यक्रमात युवक-युवतींचा उत्साह संचारला होता. या उत्सवात सहभागी झालेल्या स्नेहालय, अनामप्रेम मधील मुला-मुलींना संस्था व तेजस गांधी यांच्या वतीने मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले. दांडिया नाईटमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये मिस्टर जिव्हाळा- यश लोढा, मिस जिव्हाळा- अश्‍विनी सोनी, बेस्ट सोलो डान्सर (पुरुष व महिला)- गुनाली मुथा, माहीर नागपाल, बेस्ट कपल डान्स- वैष्णवी व सार्थक, बेस्ट ड्रेसअप कपल- समीर व सोनाली बोरा, बेस्ट ग्रुप डान्स प्रथम- अजिंक्य डान्स स्टुडिओ फिटनेस, द्वितीय- जेजेडी ग्रुप, किड्स बेस्ट ग्रुप डान्स- ग्लोविंग स्टार्स, बेस्ट लेडीज कपल- वैधी बोरा, पूजा चंगेडिया, बेस्ट किड्स- द्रोवीत पाटील, बेस्ट ड्रेसिंग किड्स- जिया जग्गड, कार्तिक चंगेडिया, भूमी पोखरणा यांनी बक्षीसे पटकाविली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना सोने व चांदीची बक्षिसे व भेटवस्तू देण्यात आली. तर ५ विजेत्यांना सोडतद्वारे सोन्याची नाणी बक्षीस देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रिया नागपाल व ज्योती शाह यांनी केले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article