गुंगीचे औषध देत दोघांकडून तरुणीवर अत्याचार:मुंबईच्या वांद्रे परिसरात लिफ्टच्या बहान्याने घडला प्रकार, एकाला पोलिसांनी केली अटक

1 hour ago 1
वांद्रे परिसरात लिफ्ट देत 18 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. दोघांनी घरी सोडतो म्हणत तरुणीला लिफ्ट दिली. तरुणी चारचाकीत बसताच त्या दोघांनी पिण्यासाठी गुंगीचे औषध असलेले पाणी दिले, यानंतर तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अत्याचारानंतर दोन संशयित आरोपींनी कुणाला जर या प्रकरणी काही सांगितले तर तुला जीवे मारू अशी धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी निर्मलनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसऱ्याचा शोध घेतला जात आहे. मुंबईत शेजाऱ्याने केला अत्याचार मिरा रोडमध्ये एका 18 वर्षीय तरुणीवर शेजाऱ्यानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना काशिमिरा येथे रविवारी (ता. 6) घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी 38 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. रविवारी सायंकाळी पीडिता व तिची आई दोघेही घरात असताना शेजाऱ्याने पीडितेला घराबाहेर बोलावत व तिला बळजबरीने त्याच्या घरी नेले.त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला घरातच डांबून ठेवले. घरी आल्यानंतर पीडितेने घडलेल्या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी सोमवारी काशिमिरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. परभणीत चिमुकलीवर अत्याचार परभणीच्या सोनपेठ शहरात इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञातावर पॉस्को आणि इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी 8 पथकांची नियुक्ती केली आहे. सांगलीमध्ये महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार सांगलीमध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रण करत त्याआधारे पुन्हा अत्याचार करण्याचा प्रकार सांगलीत समोर आला. या प्रकरणी संशयिताला अटक करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी मंगळवारी सांगितले

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article