Online Fraud | ऑनलाईन फसवणुकीतील ३० लाख मिळाले परत

2 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

09 Oct 2024, 7:14 am

Updated on

09 Oct 2024, 7:14 am

मिरा रोड : मिरा भाईंदरमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आलेल्या दोघाजणांचे ३० लाख रुपये सायबर पोलिसांनी तपास करून परत मिळवून दिले आहेत. मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय हद्दीतील भाईंदर व मिरा रोड येथे राहणाऱ्या दोघांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणाचा सायबर पोलिसांनी तपास करून फसवणूक झालेल्या दोघांना ३० लाख रुपये परत मिळवून दिले आहेत.

भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे तक्रारदार संघवी यांनी फेसबुकवर शेअर ट्रेडिंग करून अधिक नफा मिळविण्याबाबत जाहिरात पाहिली. जाहिरातीमध्ये दिलेल्या व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये मॅसेज करून तक्रारदार यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक अॅड केला. त्यानंतर नफा मिळविण्याच्या उद्देशाने पैशांची गुंतवणूक केली. तक्रारदार यांनी नफा मिळविलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रक्कम काढता येत नसल्याचे लक्षात आल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार तक्रारदार यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी अर्जानुसार फसवणुकीबाबत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार तक्रारदार यांच्या व्यवहाराचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग झाल्याची माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रकम वर्ग झालेले खाते तत्काळ गोठविण्यासाठी संबंधीत बँकेंना पत्रव्यवहार करण्यात आले. सायबर पोलीस ठाणे यांच्याकडून वारंवार पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणूक झालेल्या रकमेपैकी २१,९३,२७९ रुपये मूळ खात्यात परत मिळवून देण्यात आले आहे.

दुसऱ्या फसवणूक झालेल्या गुन्ह्यात तक्रारदार दळवी हे मिरारोड पोलीस ठाणे हद्दीत राहत असून त्यांनी अॅपमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळत असल्याबाबतची जाहिरात पाहिली. सदर अॅपची पडताळणी न करता तक्रारदार यांनी ३५,५५,२३६ रुपयांची गुंतवणूक केली. परंतु त्यानंतर तक्रारदार यांना कोणताही परतावा न मिळाल्याने त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याबाबत तक्रारदार यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार बँकेबरोबर व न्यायालय यांच्याकडे पाठपुरावा करून तक्रारदार यांना फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी ८,३०,८८२ रुपये मूळ खात्यात परत मिळवून देण्यात आले आहेत. अशा प्रकारे दोन्ही दाखल गुन्ह्यातील ३० लाख ४१ हजार १६१ रुपये तक्रारदार यांना सायबर पोलीसांनी परत मिळवून दिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article