मिरा रोड : लाखोंचे दागिने चोरणाऱ्याला अटकFile Photo
Published on
:
09 Oct 2024, 7:09 am
Updated on
:
09 Oct 2024, 7:09 am
मिरा रोड : नवघर पोलीस ठाणे हद्दीत ९ लाखाचे सोने चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला चोरी केलेल्या मुद्देमालासह नवघर पोलीसांनी अटक केली आहे. नवघर पोलीस ठाणे हद्दीतील अमित मंडल (३२), यांच्या घरातील ठेवलेले नऊ लाख सात हजार चाळीस रूपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात आकाश गुप्ता (वय २५) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ९,०७,०४० रूपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम अशी संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.