दलित वस्तीचा निधी इतरत्र वापरणाऱ्या पाथर्डी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदवा:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोणग्याला फलक लावून केले आंदोलन

2 hours ago 1
दलित वस्तीसाठी आलेला निधी इतर दुसऱ्या ठिकाणी वापरण्यात आल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीच्या ( शरदचंद्र पवार गट) ग्राहक संरक्षण समितीच्या वतीने टोणग्याला फलक लावून आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,अशी मागणी राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे पाथर्डी तालुका अध्यक्ष अरविंद सोनटक्के यांनी केली. पाथर्डी नगरपरिषदेने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेच्या लेखाशीर्षातून नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक २ तसेच पाथर्डी नगरपालिका अंतर्गत ९ ठिकाणी जी कामे केली आहे. मात्र या लेखाशीर्षकातील निधीतूनच दलित वस्ती सोडून इतरत्र ठिकाणी कामे करण्यात आली. त्यामुळे अनुसूचित जाती जमाती आ वर्ग लाभापासून वंचित राहिला आहे. झालेली कामे ही अपूर्ण स्वरूपाची असून. याबाबत समाज कल्याण आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर समितीने केलेल्या चौकशीत मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले होते. संबंधित मुख्याधिकारी विभाग प्रमुख कंत्राटदार व इतरांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे अभिनव आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर त्यानंतर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रमोद पगारे, संजय पगारे, विठ्ठल सोनटक्के, युसुफ शेख, सुरेश हुलजुते, दादू पगारे, आसिफ शेख, सोमनाथ रोडे, सुरेश पगारे, विनायक चौधरी, बंडू पगारे उपस्थित होते. कारवाई होत नसल्याने बैठा सत्याग्रह पाथर्डीतील ११ कामांची चौकशी झाली असल्यामुळे संबंधित मुख्याधिकारी विभाग प्रमुख ठेकेदार व इतर लोक सेवकांवर उपरोक्त कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा व हा अहवाल जिल्हाधिकारी व सह आयुक्त प्रशासन यांना प्राप्त होऊन २० दिवस उलटून गेले आहे तरी त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने हे संबंधित लोकसेवकांना पाठीशी घालत आहेत. गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली होती मात्र कारवाई होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह उपोषण करण्यात आल्याचे सोनटक्के यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article