भारताने पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताचा डाव 150 धावांवरच आटोपला. त्यामुळे भारताचं काही खरं असंच वाटत होतं. पण कर्णधार आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव फक्त 104 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला आधीच 46 धावांची आघाडी मिळाली होती. या आघाडीसह पुढे खेळताना ओपनिंगला आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 201 धावांची भागीदारी केली. त्यामुळे दुसऱ्या डावात टीम इंडिया मजबूत स्थितीत आली. यशस्वी जयस्वालने 297 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 161 धावा केल्या. तर केएल राहुलने 176 चेंडूंचा सामना करत 5 चौकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने जबरदस्त कामगिरी केली.
विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नववं शतक ठोकलं. यासह टीम इंडियाने 487 धावांवर मजल मारली. भारताच्या 533 धावा झाल्या होत्या आणि विराटचं शतकही त्यामुळे कर्णधार जसप्रीत बुमराहने डाव घोषित केला. आता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचं आव्हान आहे. आता हे आव्हान ऑस्ट्रेलिया गाठणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज